मुंबई, 01 मे: सध्या महाराष्ट्रासह देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे असंख्य रुग्णांचा जीव जात आहे. मधुमेह, हृदयविकारासारखे गंभीर आजार असणाऱ्या लोकांसाठी कोरोना विषाणू अतिशय घातक ठरत आहे. अशा स्थितीत एका दोन महिन्यांच्या बालकानं हृदयविकारासोबतच कोरोनावरही मात केल्याची घटना समोर आली आहे. कार्डियाक सर्जरीसारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होतं आहेत. अवघ्या दोन महिन्यांच्या बाळानं दोन जीवघेण्या आजारावर मात केल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून ही बाब चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं काहींनी म्हटलं आहे. नंदुरबार येथील रहिवासी असणाऱ्या कृष्णा अगरवाल यांच्या एक महिन्याच्या मुलीच्या हृदयात गंभीर बिघाड असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे त्यांनी बाळावर पुढील उपचार करण्यासाठी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल केलं आलं. पण याठिकाणी शस्त्रक्रिया करण्याची सर्व तयारी केली जात असताना, बाळाला कोविडची बाधा असल्याचं आरटी पीसीआर चाचणीतून समोर आलं. बाळाला हृदयविकारासोबत कोविडची बाधा झाल्याचं समजताचं अगरवाल परिवाराच्या चिंता वाढल्या होत्या. पण या लढाऊ बाळानं दोन्ही आजारांवर मात केली आहे. दैनिक पुण्यनगरीनं दिलेल्या वृत्तानुसार, बाळाला कोविडची लागण झाल्याचं समजताच शस्रक्रिया करण्याची वेळ लांबणीवर टाकण्यात आली. बाळाला पंधरा दिवस रुग्णालयातचं आयसोलेशनमध्ये ठेवून तिच्यावर उपचार करण्यात आले. या दोन्ही गंभीर आजारांमुळे तिची ऑक्सिजनची पातळी 86 टक्क्यांपर्यंत खालावली होती. पण पंधरा दिवसांत तिने कोरोनावर मात केली. त्यानंतर बाळावर हृदयविकारासंबंधित कार्डियाक सर्जरी केली. बराच काळ अखंड चाललेल्या शस्रक्रियेला बाळाने चांगला प्रतिसाद दिला असून सध्या बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होतं आहेत. हे ही वाचा- पालकांनो लक्ष द्या! मुलांना कोरोना झाल्यास काय करावं? केंद्राने दिला सल्ला विशेष म्हणजे बाळाची आई देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं त्यांनाही आयसोलेट करण्यात आलं होतं. तर बाळाच्या प्रकृती काही बिघाड झाल्यात तातडीनं सर्जरी करण्यासाठी डॉक्टरांची एक टीम सज्ज ठेवण्यात आली होती. पण सुदैवानं बाळाला काहीही झालं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.