मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

या कंपनीचा मोठा दावा! लक्षण नसणाऱ्यांवरही प्रभावी ठरणार कोरोना लस, एवढी आहे किंमत

या कंपनीचा मोठा दावा! लक्षण नसणाऱ्यांवरही प्रभावी ठरणार कोरोना लस, एवढी आहे किंमत

अमेरिकेतील मॉडर्ना (Moderna Inc) या कंपनीने केलेल्या दाव्यानुसार ही लस लक्षणे न दिसणाऱ्या (Asymptomatic Infections) कोरोना रुग्णांवर देखील प्रभावी ठरणार आहे.

अमेरिकेतील मॉडर्ना (Moderna Inc) या कंपनीने केलेल्या दाव्यानुसार ही लस लक्षणे न दिसणाऱ्या (Asymptomatic Infections) कोरोना रुग्णांवर देखील प्रभावी ठरणार आहे.

अमेरिकेतील मॉडर्ना (Moderna Inc) या कंपनीने केलेल्या दाव्यानुसार ही लस लक्षणे न दिसणाऱ्या (Asymptomatic Infections) कोरोना रुग्णांवर देखील प्रभावी ठरणार आहे.

    नवी दिल्ली, 16 डिसेंबर: कोरोना व्हायरसच्या संकटाला (Coronavirus Crisis) आता वर्षभराचा काळ लोटला आहे. या काळात अनेक कंपन्यांनी लस (COVID-19 Vaccine) तयार करण्यासाठी प्रयत्न केले असून काही कंपन्यांना यामध्ये यश देखील आले आहे. ब्रिटनमधे पहिली लस बाजारात आली असून लसीकरणाला सुरुवात देखील झाली आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या लशी प्रभावी असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता अमेरिकन कंपनी मॉडर्नाने (Moderna Inc) नवीन दावा केला आहे. या कंपनीने केलेल्या दाव्यानुसार ही लस लक्षणे न दिसणाऱ्या (Asymptomatic Infections) कोरोना रुग्णांवर देखील प्रभावी ठरणार आहे. त्याचबरोबर या लसीचा एक डोस या रुग्णांना पुरेसा ठरणार असून एका लसीमध्येच त्यांना फायदा मिळणार आहे. पहिल्या डोसनंतर लगेच दिसणार प्रभाव कंपनीने यासंदर्भात निरीक्षणांना (Clinical Trials) सुरुवात केली असून आतापर्यंतच्या निरीक्षणानुसार ही माहिती समोर आली आहे. लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांना या लसीमुळे दिलासा मिळणार असून पहिला डोस घेतल्यानंतर लगेच याचा प्रभाव दिसू लागणार असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. याबाबत संपूर्ण विश्लेषण झाले नसून यावर अजूनही काम सुरु असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. कंपनीने अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाला  (USFDA) यासंबंधी कागदपत्रे सादर केली आहेत. त्याचबरोबर कंपनीने असं म्हटलं आहे की, ट्रायलमध्ये सामील होणाऱ्या 38 लक्षणं नसणारे लोक दुसरा डोस दरम्यान देखील पॉझिटिव्ह आढळून आले होते. (हे वाचा-कोरोनामुक्त रुग्णांना होतोय Brain fog; नेमकी काय आहे ही समस्या?) किती असणार लशीची किंमत? अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने लसीची किंमत जाहीर केली आहे. मॉडर्ना कंपनीने सांगितले आहे की, ‘सरकारकडून एका डोससाठी कंपनी 25 डॉलर (1 हजार 854 रुपये) पासून 37 डॉलर (2 हजार 744 रुपये) घेईल. तसेच किती प्रमाणात लशीची ऑर्डर दिली जाईल, त्याप्रमाणे किंमत ठरवली जाईल.’ याबाबतची माहिती कंपनीचे सीईओ स्टीफन बँसेल यांनी दिली आहे. ही लस 94.5 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. भारत सरकार देखील या कंपनीच्या संपर्कात आहे. या लसीची किंमत सामान्य तापाच्या लशीबरोबर असून 10 ते 50 डॉलरदरम्यान याची किंमत असणार आहे. (हे वाचा-मुंबईसह राज्यात रुग्णांमध्ये घट, Recovery Rate गेला उच्चांकी 94 टक्क्यांच्या जवळ) 3 महिन्यांपर्यंत राहणार अँटीबॉडी ही लस घेतल्यानंतर शरीरामध्ये 3 महिने अँटीबॉडी राहत असल्याचा दावा कंपनीने केलेला आहे. चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या पहिल्या टप्प्यातील 34 जणांचे निरीक्षण करून कंपनीने हे सांगितले आहे. या 34 जणांमध्ये 3 महिने अँटीबॉडी टिकल्या असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या लसीच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या नॅशनल इंस्टिट्यूट फॉर अलर्जी अँड इंफेक्शियस डिसीज (NIAID)  या संस्थेने याचा अभ्यास केला आहे. यामध्ये या सहभागी 34 जणांचा अभ्यास करण्यात आला आहे. यापूर्वी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये (new england journal of medicene)  प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये यापूर्वी लस घेतल्यानंतर अँटीबॉडीचा प्रभाव काही महिन्यांनंतर कमी होत असल्याचा दावा करण्यात आला होता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या