कोरोनामुक्त रुग्णांना होतोय Brain fog; नेमकी काय आहे ही समस्या?

कोरोनामुक्त रुग्णांना होतोय Brain fog; नेमकी काय आहे ही समस्या?

यात केंद्रीय मज्जासंस्थेवर (Central nervous sysytem) परिणाम होऊन स्मृती, ध्यान, नियोजन आणि भाषेविषयी समस्या उदभवतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 डिसेंबर :  कोरोना (Corona) होऊन गेल्यानंतर रुग्णांना पोस्ट कोविड सिंड्रोमचा (Post Covid Syndrom) सामना करावा लागतो.  पोस्ट कोविड सिंड्रोमबाबत  ही नवी बाब असून त्यातील बारकाव्यांबाबत अधिक अभ्यास सुरू आहे.कोरोनातून रुग्ण बरा झाल्यानंतर हलका ताप येणे किंवा वारंवार ताप (Persistent Fever) येणे ही बाब सामान्य आहे कारण  थोडा त्रास होतो पण हा ताप बरा होऊ शकतो. मात्र काही रुग्ण एक वेगळीच तक्रार घेऊन येत आहेत. त्याला वैद्यकीय परिभाषेत कोविड-19 ब्रेन फॉग (Brain Fog) असं म्हटलं जातं.

कोरोनातून बरे झाल्यानंतर थकवा किंवा अशक्तपणा जाणवणं हे सामान्य लक्षण आहे. रुग्णाला दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक ऊर्जा  जाणवण्यासाठी बराच कालावधी लागतो. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही लक्षणं दिसून येतात. त्यानंतर चव आणि वास न येणं ही दुसरी समस्या आहे. किमान एक महिना हलका ताप येणे ही पण सामान्य स्वरुपाची तक्रार आहे. या समस्या प्रत्यक्षात कमी आणि मनोवैज्ञानिक अधिक प्रमाणात असतात. त्यानंतर सर्वाधिक प्रमाणात जाणवणारी समस्या ब्रेन फॉग. डॉ. सिंघल यांच्याकडे अशा समस्या जाणवत असलेली केस देखील आली होती. त्या रुग्णामध्ये कोरोनाची सामान्य लक्षणे होती आणि त्याला खास उपचारांची गरज देखील नव्हती. परंतु त्यास एक महिन्यापासून ब्रेन फॉगची समस्या भेडसावत होती. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली त्याला कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे त्याला रुग्णालयात भरती करावं लागलं होतं.

ब्रेन फॉगची समस्या ही गंभीर आहे. मग ही दिर्घकाळ टिकणारी समस्या आहे की तात्पुरती?  ब्रेन फॉग म्हणजे नेमके काय ?  हे जाणून घेणं महत्वाचे आहे.  तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रुग्णाला कोरोना (Corona) झाला आहे हे स्पष्ट होताच, त्याला जादा प्रमाणात औषधं दिली जाणार नाहीत किंवा त्याच्यावर अतिरिक्त उपचार केले जाणार नाहीत याची काळजी घेतली गेली पाहिजे. याबाबत कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातील संसर्गजन्य विकार तज्ज्ञ तनु सिंघल यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार, कोरोनाबाधित रुग्णाला विनाकारण बराच काळ स्टेराॅईडच्या सहाय्याने उपचार दिले गेले तर त्या रुग्णांमध्ये अनेक समस्या दिसून येत आहेत.

हे वाचा - कोरोनातून मुक्त झालेल्या लोकांना प्राणघातक 'फंगल इन्फेक्शनने' ग्रासलं

ही कोणतीही मेडिकल कंडिशन (Medical Condition) नाही, हे आपण सर्वप्रथम जाणून घेतले पाहिजे. विचार करणं आणि लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम होणं म्हणजे वैद्यकीय परिभाषेत त्याला ब्रेन फॉग म्हणले जाते. या समस्येनेग्रस्त रुग्णांना लक्ष केंद्रीत करणे, एखादी गोष्ट किंवा म्हणणे लक्षात ठेवण्यास अडचणी येतात. गर्भवती महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसते.ही समस्या जेव्हा गंभीर होते तेव्हा त्यास स्लेरोसिस किंवा एमएस असे संबोधले जाते. यात केंद्रीय मज्जासंस्थेवर (Central nervous sysytem) परिणाम होऊन स्मृती, ध्यान, नियोजन आणि भाषेविषयी समस्या उदभवतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार विशेष औषधोपचारांमुळे या समस्या उदभवतात. कोणतेही औषध घेतल्यानंतर जर तुम्हाला विचार करण्यात किंवा कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्यास अडचणीचे जात असेल तर तुम्ही तातडीने डॅाक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. कॅन्सर (Cancer) रुग्णांना केमोथेरपी (Chemotherapy) दिल्यानंतर अशा समस्यांना सामोरे जावे लागते. त्याला केमो ब्रेन (Chemo brain) देखील म्हणले जाते. त्याशिवाय मेनोपाज, सातत्याने थकवा, नैराश्य, झोपेसंबधी समस्यांमुळे देखील ब्रेन फॉग होतो.

ब्रेन फॉगची बहुतांश लक्षणे कोरोनामुक्त रुग्णांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतात. याचा अर्थ असा की कोरोनामुक्ती नंतर रुग्णांमध्ये जर कोणती गंभीर लक्षणे दिसू लागली तर तत्काळ इलाज करणे आवश्यक आहे.

हे वाचा - रोडमॅप तयार! भारतामध्ये कोणत्या राज्यात कशाप्रकारे दिली जाईल कोरोना लस

कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णामध्ये जी लक्षणे दिसून येतात, त्यातील काही प्रमुख लक्षणांमध्ये  थकवा, श्वास घेण्यास त्रास होणं, सांधेदुखी, छातीत दुखणं, ब्रेन फॉग, चव किंवा वास घेण्याची क्षमता जाणं, झोपेसंबंधी समस्या जाणवतात.  त्याचबरोबर थ्रॉम्बॉसिस, मायोकार्डीनलबाबतच्या गंभीर समस्या देखील अनेक रुग्णांमध्ये दिसून आल्या आहेत. कोरोना विषाणूचा शरीरावर दिर्घकालीन परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळेच प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक असून, कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा वेगळे लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे डॉक्टर सातत्याने सांगत आहेत.

डॉ. सिंघल म्हणाल्या, की कोरोना हा अतिशय घातक विषाणू असून कोरोनामुक्त रुग्ण बराच काळ काही ना काही तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे जाताना दिसत आहेत. स्वादूपिंड, हार्ट, ब्रेन आणि किडनी यांच्याशी निगडीत काही ना काही समस्या रुग्णांना भेडसावत आहेत. त्यामुळे कोरोना (Corona) होऊ नये यासाठी पुरेपुर दक्षता घेणे आवश्यक आहे.

Published by: Priya Lad
First published: December 15, 2020, 8:22 PM IST

ताज्या बातम्या