मुंबई 15 डिसेंबर: राज्यात कोरोना रुग्णांचा घसरत असलेला आलेख सध्या कायम आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांना दिलासा मिळाला आहे. दिवसभरात 4 हजार 395 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यातल्या बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ही 17 लाख 66 हजार 10 झाली आहे. राज्यांचा Recovery Rate 93.60 म्हणजेच 94 टक्क्यांच्या जवळ गेला असून हा उच्चांकी दर आहे. गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार 442 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 70 जणांचा मृत्यू झाला. राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या ही 18 लाख 86 हजार 807 झाली आहे. त्या पैकी 17 लाख 66 हजार जण बरे झाले. उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही घट झाली असून राज्यात सध्या 71 हजार 356 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतली 403 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सभागृहात बोलताना राज्यातला कोरोनाचा आलेख घसरणीला लागला असला तरी धोका कमी झालेला नाही असं म्हटलं आहे. ते म्हणाले, धारावी मॉडेलचे कौतुक जगाच्या पातळीवर केलं गेलं.
आजही औषध नाही, लस कधी येणार माहित नाही, पंतप्रधानांनी एक कॉन्फरन्स घेतली, मात्र लस कधी येणार, ती कशी देणार हे सांगितलं नाही, त्यामुळे पंतप्रधानांनी प्रेझेंटेशन कशासाठी घेतलं हे आम्हाला समजलं नाही.
Pfizer नंतर आता Moderna औषधी कंपनीवरही सायबर हल्ला; गोपनीय माहिती गेली चोरीला
आता केवळ मास्क लावणं हात धुणे एवढंच आमच्या हातीी आहे, मग हात धुवूून मागे लागा अथवा हात न धुता मागे लागा, आपण कोरोनाची लढाई लढतो आहोत, आलेख थोडा खाली आला असला तरी पाश्चिमात्य देशात कोरोनाने पुन्हा उसळी मारली आहे. तो आकडा वाढल्यानंतर तिथली परिस्थिती फार बिकट आहे, तशी स्थिती इथे येऊ नये याची आपण काळजी घेतोय.
माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीीम आपण राबवली ती राबवणारे आपले राज्य कदाचित जगात पहिले राज्य असेल.या मोहीमेत घरोघरी जाऊन पाहणी केलीी, त्यामुळे महाराष्ट्राचा आऱोग्य नकाशा आपल्याकडे तयार झाला. दुर्दैवाने मृत्यूमुुखी पडलेल्यांची संख्या जास्त आहे, ती लपवलेली नाही.
रोडमॅप तयार! भारतामध्ये कोणत्या राज्यात कशाप्रकारे दिली जाईल कोरोना लस
देशात महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी या संकटाचा मुुकाबला करण्यासाठी डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला. केंद्राने लॉकडाऊन करण्याच्या आधी आपण एक एक गोष्टी बंद करत आलो होतो. असंही त्यांनी सांगितलं.