कानपूर, 19 मे : भारतात सध्या चौथ्या टप्प्याचा लॉकडाऊन सुरू आहे. यामुळं परराज्यात अडकलेले मजूर आपल्या घरी जाण्यासाठी मिळेल त्या मार्गाचा वापर करत आहेत. भारतातील इतर राज्यांत काम करणारे कामगार त्यांच्या राज्यात व जिल्ह्यात जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करत आहेत. काही ट्रकमधून, काही कारमधून, काही मोटरसायकलवरून तर काहींनी चालत हजारो किमी प्रवासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, मुंबईतील वांद्रे येथे काम करणाऱ्या एका युवकासोबत घरी जात असताना एक विचित्र प्रकार घडला. दुचाकीवरून गावी जात असताना त्याचा अपघात झाला. मुंबईवरून तो उत्तर प्रदेशाताली बांदा येथे जात होता. जवळजवळ 1000 किमीहून जास्त अंतर पार केल्यानंतर त्याचा अपघात झाला.
अपघात झाल्यानंतर या युवकास कानपूर येथील खासगी नर्सिंग होममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पायाला फ्रॅक्चर झाल्याच्या तक्रारीवरून, देहेली सुजानपूरच्या नर्सिंग होममध्ये त्याला प्लास्टर घालण्यात आलं. त्याच दरम्यान डॉक्टरांनी त्याच्या रक्ताचे नमुने घेतले होते. त्याचे रिपोर्ट आल्यानंतर मात्र डॉक्टर हैराण झाले. हा युवक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.
वाचा-मनानं श्रीमंत असलेला भिकारी! 100 कुटुंबांना दिलं महिन्याभराचं धान्य आणि मास्क
रुग्णालयात उडाली खळबळ
या प्रकरणानंतर संपूर्ण रुग्णालयात खळबळ उडाली. पॅरामेडिकल कर्मचारी एक एक करून बाहेर आले. तातडीने याची माहिती सीएमओ कार्यालयात देण्यात आली आणि त्याला कोव्हिड-19 आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. जिथे त्यावर उपचार केले जात आहेत. कानपूरचे सीएमओ अशोक कुमार शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार बांदा येथील नरैनी गावात राहणारा 32 वर्षांचा मुलगा मुंबईत काम करतो. तो दुचाकीसह मुंबईहून बांदाकडे येत होता. वाटेत एक अपघात झाला ज्यानंतर त्याला कानपूर येथील खासगी नर्सिंगमध्ये दाखल केले. खाजगी पॅथॉलॉजीला पाठविलेला नमुना, ज्यामध्ये त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. दरम्यान त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा सध्या शोध सुरू आहे.
वाचा-बापाचा लेकरासाठी जीव तुटला, पण मुलानेच हात उगारला कारण...
वाचा-वुहानमधली 'ती' स्पर्धा ठरली जगासाठी कोरोनाचा टाइम बॉम्ब, दिग्गज खेळाडूंचा खुलासा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona