Home /News /videsh /

वुहानमधली 'ती' स्पर्धा ठरली जगासाठी कोरोनाचा टाइम बॉम्ब, दिग्गज खेळाडूंचा खुलासा

वुहानमधली 'ती' स्पर्धा ठरली जगासाठी कोरोनाचा टाइम बॉम्ब, दिग्गज खेळाडूंचा खुलासा

चीननं नोव्हेंबरमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याचे मान्य केले होते. पण, आता फ्रान्सच्या एका खेळाडूनं त्याआधीच चीनमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याचा खुलासा केला आहे.

    मॉस्को, 19 मे : चीनच्या वुहानमधून कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत कोरोनामुळं जगात तब्बल 48 लाखहून अधिक आहे, तर मृतांचा आकडा 3 लाख झाला आहे. कोरोनाचं केंद्र मानल्या जाणाऱ्या वुहानच्या लॅबमधून कोरोनाचा प्रसार झाल्याचा आरोप अनेक देशांनी केला. मात्र हा व्हायरस कसा पसरला, याबाबत अद्याप कोणालाच माहिती नाही आहे. दरम्यान चीननं नोव्हेंबरमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याचे मान्य केले होते. पण, आता फ्रान्सच्या एका खेळाडूनं त्याआधीच चीनमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याचा खुलासा केला आहे. फ्रान्सची खेळाडू एलोडीए क्लोउव्हेल आणि तिचा बॉयफ्रेंण्ड ऑक्टोबर 2019मध्ये वुहानमध्ये जागतिक मीलेटरी स्पर्धा खेळण्यासाठी गेले होते. या स्पर्धेत 100 हून अधिक देशांतील 10 हजार खेळाडूंचा समावेश होता. त्याचवेळी अनेक खेळाडू आजारी पडले. याच स्पर्धेदरम्यान एलोडीओ आणि तिचा बॉयफ्रेंण्ड व्हॅलेंटीन बेलौड यांना कोरोना झाला. तर, या स्पर्धेत सहभागी झालेल्या इटालियन तलवारबाज मॅटेओ टॅगलिआरिओलनेही या स्पर्धेनंतर कोरोनाची लक्षणं दिसल्याचा दावा केला आहे. तर जर्मनीची व्हॉलीबॉलपटू जॅकलीन बॉकनं वुहानमध्ये दाखल झाल्यानंतर काही दिवसांत खेळाडू आजारी पडल्याचा खुलासा केला. दरम्यान चीननं याआधी डिसेंबरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याची माहिती दिली होती. वाचा-चीननं लपवला कोरोनाबाधितांचा आकडा? आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा आला समोर याआधी चीनवर कोरोनाबाधितांचा आकडा लपवल्याचा आरोपही केला जात आहे. चिनी सैन्याच्या National University of Defense Technologyने कोरोना संदर्भातील एक डेटा तयार केला होता. आता हा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. चीनमध्ये 6 लाख 40 हजारहून अधिक कोरोना रुग्ण होते, मात्र चीन सरकारनं केवळ 82 हजार रुग्ण असल्याचे जाहीर केलं आहे. ही धक्कादायक आकडेवारी फॉरेन पॉलिसी मॅगझिन आणि '100 रिपोर्टर' मध्ये प्रसिद्ध केली आहे. वाचा-अमेरिकेच्या 'बायो लॅब'मध्येच तयार झाला कोरोना व्हायरस, चीन आणि रशियाचा आरोप चीननं लपवली कोरोना संदर्भातील माहिती '100 रिपोर्टर' या मासिकेनं अशी माहिती दिली आहे की, "हा डेटा व्यापक स्वरुपाचा नसला तरी, यातील आकडेवारी आश्चर्यकारक आहे. याच 6 लाख 40 हजारहून अधिक अपडेट आहेत, यात किमान 200 शहरांची माहिती आहे. म्हणजेच या आकडेवारीवरून 6 लाख 40 हजार प्रकरणं नोंदवली गेली आहेत". बीजिंगने कोरोना व्हायरस डेटा किती आणि किती लोकसंख्येवर जमा केला याचा उल्लेखही यात केला आहे. या डेटाच्या लीकमुळे चीनचा खोटेपणा जगासमोर आला आहे. चीनकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी परदेशी माध्यमांना "निःपक्षपाती" अहवाल देण्यास सांगितलं आहे. प्रवक्त्याने ट्विटरवर लिहिलं की, “कोव्हिड-19 विरुद्ध जिंकण्याकरिता अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी गरजेचे आहे की जगभरातील सर्व माध्यमांनी खरी माहिती द्यावी". गेल्या महिन्याभरात पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाचा-मास्क घालून धावत होता तरूण, काही मिनिटांत फुटली फुफ्फुसं
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या