Home /News /national /

मनानं श्रीमंत असलेला भिकारी! 100 कुटुंबांना दिलं महिन्याभराचं धान्य आणि वाटले 3 हजार मास्क

मनानं श्रीमंत असलेला भिकारी! 100 कुटुंबांना दिलं महिन्याभराचं धान्य आणि वाटले 3 हजार मास्क

दिव्यांग असणारा राजू तीन पायांच्या सायकलवरून दिवसभर भिक मागतो. आपला उदर्निवाह करून साठवलेल्या पैशातून समाजासाठी काम करतो.

    पठाणकोठ, 19 मे : कोरोनाचं संकट देशावर असताना सगळे मतभेत बाजूला ठेवून माणुसकीचं दर्शन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या महासंकटाच्या काळात मजूर, गरीब, वृद्ध, गर्भवती महिला यांच्यासाठी हजारो मदतीचे हात पुढे येत असल्याचं दिसत आहे. कुणी जेवण देतंय तर कुणी पैसे तर कुणी मोफत सेवा देऊन यांची अडचण कमी कऱण्याचा प्रयत्न करत आहे. याच दरम्यान एका भिकाऱ्यानं मनाची श्रीमंती दाखवत गरजू आणि मजुरांना मोठी मदत केली आहे. पंजाबच्या पठाणकोट परिसरातील एका दिव्यांग भिकाऱ्यानं आपल्याकडे असलेल्या पैशांमधून मदत केली आहे. भिक मागून आपलं पोट भरण्याएवढे पैसे त्यांनं बाजूला ठेवले असून उरलेल्या पैशातून 100 कुटुंबांना धान्य आणि 3 हजार मास्क वाटले आहेत. दिव्यांग असणारा राजू तीन पायांच्या सायकलवरून दिवसभर भिक मागतो. त्यातून जमलेल्या पैशातून आपल्या उदर्निवाहासाठीचे पैसे बाजूला ठेवतो आणि उरलेले पैसे जमा करून ठेवून देतो. लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या खाण्याची भ्रांत झालेली राजूला पाहावली नाही. त्यानं आपल्याकडे साठवलेल्या पैशांतून 100 कुटुंबीयांना धान्य घेऊन दिलं आहे. हे वाचा-ICMRने कोरोना टेस्टच्या नियमात केले मोठे बदल, आता 'या' लोकांचीही होणार चाचणी अनेक वेळा राजूनं केली आहे छोट्या मुलांची आणि विद्यार्थ्यांची मदत राजूच्या घरच्यांनी त्याला दूर केल्यानंतर त्यानं भिक मागून आपला उदरनिर्वाह केला. उरलेल्या पैशातून त्याने बर्‍याच मुलांची शालेय फी भरली आहे आणि अनेक गरीब मुलींच्या लग्नाची व्यवस्था केली आहे. राजूने सांगितले की त्याने 22 मुलींच्या लग्नासाठी पैसे खर्च केले. इतरकच नाही तर उन्हाळ्यात अनेकांना प्यायला पाणी मिळत नाही तेव्हा तो स्वत: पैसे खर्च करून पाण्याची व्यवस्था करत असल्याचीही माहितीही मिळाली आहे. हे वाचा-X-ray मार्फत होऊ शकतं कोरोनाव्हायरसचं निदान; खर्च आणि वेळही वाचणार हे वाचा-महिला SPचीं कमाल, रात्री 12 वाजता भुकेल्या मजुरांना स्वयंपाक करून दिलं जेवण संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Panjab, Pathankot

    पुढील बातम्या