विरेंद्र भारद्वाज, मंडी, 11 मे: भारतात कोरोनाचा काळ (Coronavirus Pandemic) अत्यंत बिकट सुरू आहे. अशावेळी अनेकजण मदतीसाठी हात पुढे करत आहेत. पण दुसरीकडे काही जणांच्या निर्दयीपणामुळे अनेकांना वाईट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. एका घरमालकाने घरात येऊ न दिल्याने टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या इसमास त्याच्या पत्नीसह दोन दिवस टॅक्सीतच राहण्याची वेळ आली होती. यात धक्कादायक बाब म्हणजे त्याची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह (COVID-19 Positive) होती, आणि ते दोन दिवस त्यांच्या दोन वर्षाच्या मुलासह टॅक्सीत राहिले होते. हे प्रकरण हिमाचल प्रदेशच्या मंडी (Corona in Mandi) जिल्ह्यातील आहे.
मंडी जिल्ह्यातील करसोग याठिकाणी परसराम ही व्यक्ती टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करते. दोन दिवसापूर्वी पत्नीच्या तपासणीसाठी ते शिमला याठिकाणी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. त्यांच्या पत्नीची परिस्थिती ठीक होती, त्यामुळे डॉक्टरांनी होम आयसोलेशनचा सल्ला दिला होता.
हे वाचा-थायलंडहून बोलावलेल्या Call Girl प्रकरणात नवा ट्विस्ट, नेतमंडळी अडकण्याची शक्यता
परसराम पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलासह घरी परतले तेव्हा त्यांच्या घरमालकाने त्यांना घरात येण्यास नका दिला. भाडेकरूची पत्नीच कोरोना पॉझिटिव्ह असल्याने भीतीपोटी त्यांनी त्यांना घरात येण्यास नकार दिला. त्यामुळे परसराम यांच्यावर कोरोना पॉझिटिव्ह पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलासह टॅक्सीत राहण्याची वेळ आली. दोन दिवस के त्याठिकाणी राहत होते, पण कुणी त्यांची मदतही केली नाही.
डीएसपींना केला फोन
हे वाचा-ही कोरोनाची तिसरी लाट तर नाही ना? काँग्रेसच्या मंत्र्यांनी व्यक्त केली भीती
शेवटी परसराम यांनी डीएसपी गीतांजली ठाकूर यांना संपर्क केला आणि मदतीची मागमी केली. डीएसपींनी क्षणाचाही विलंब न करता परसराम यांची मदत केली. त्यांनी घरमालकाशी बातचीत करून परसराम यांना क्वार्टरमध्ये पोहोचवलं आणि कुटुंबातील माणसांसाठी रेशनची व्यवस्थाही केली. गीतांजली ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांना फोन आला होता. परसराम यांनी त्यांची कहाणी डीएसपींना ऐकवली आणि मदतीची मागणी केली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona patient, Corona updates, Coronavirus, Himachal pradesh