Home /News /maharashtra /

ही कोरोनाची तिसरी लाट तर नाही ना? काँग्रेसच्या मंत्र्यांनी व्यक्त केली भीती

ही कोरोनाची तिसरी लाट तर नाही ना? काँग्रेसच्या मंत्र्यांनी व्यक्त केली भीती

अमरावतीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा विस्फोट झाला होता. दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात सर्वात आधी लॉकडाऊन अमरावतीत करण्यात आला होता.

  अमरावती, 11 मे : 'राज्यात कोरोना (Corona) रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी 'आम्हालाही शंका आहे की ही कोरोनाची तिसरी लाट (coronavirus third wave) तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला आहे. अमरावतीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा विस्फोट झाला होता. दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात सर्वात आधी लॉकडाऊन अमरावतीत करण्यात आला होता. अमरावतीतील या परिस्थितीवर यशोमती ठाकूर यांनी चिंता व्यक्त केली आहे. पुण्यात मोलकरणीनं लंपास केले घरातील 4 लाखांचे दागिने; असं फुटलं बिंग 'अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे दक्षता घेण्याची गरज आहे तर जिल्हा यंत्रणेनं जागोजागी गावोगावी कंटेन्मेंट झोन केले आहे, त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे, पण अजूनही काही लोकं एकत नाही याची खंत मला आहे, असंही यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा स्फोट दरम्यान, राज्यात दुसरी लाट अमरावती जिल्ह्यात आलेली होती. मार्च आणि एप्रिल महिन्यात अमरावती जिल्ह्यात रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र एक एप्रिलपासून जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढायला लागली आहे. मे महिन्यात रुग्णसंख्या दररोज हजारांच्यावर गेली. मात्र, सध्या शहरांपेक्षा ग्रामीण भागात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी 75 टक्के रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. आईला सांग, 1 दिवस मी CM होणार; 22व्या वर्षी प्रेमात पडलेल्या आसामच्या CMची Story जिल्ह्यातील मेळघाट व वरूड मोर्शी,धामणगाव रेल्वे,तिवसा या भागात रुग्ण संख्या वाढत आहे. राज्यात दुसऱ्यांदा लॉक डाऊन लावला असला तरी जिल्ह्यातला हा तिसरा लॉकडाऊन आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्र - मध्य प्रदेश सीमा सील करण्यात आल्या आहे. जिल्ह्यात आशिया खंडातील चीननंतर सर्वात मोठी कापडाची बाजारपेठ आहे. त्यामुळे, व्यवसायिक व सामान्य नागरिक या लॉकडाऊनमध्ये भरडला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण -76,440. कोरोणा मुक्त - 64812 सध्या रुग्णालयात दाखल- 2231 जिल्ह्यात अक्टिव्ह रुग्ण - 10491 (ग्रामीण - 7463,शहर -3028) 1 ते 10 मे पर्यंत एकूण रुग्ण - 10723 एकूण मृत्यू - 207 ग्रामीण भागातील -127 शहर - 51 जिल्ह्याबाहेरील -29
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या