जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / पत्नी कोरोना लस घेण्यासाठी जाताच पती आधार कार्ड घेऊन चढला झाडावर, कारण ऐकून व्हाल हैराण

पत्नी कोरोना लस घेण्यासाठी जाताच पती आधार कार्ड घेऊन चढला झाडावर, कारण ऐकून व्हाल हैराण

पत्नी कोरोना लस घेण्यासाठी जाताच पती आधार कार्ड घेऊन चढला झाडावर, कारण ऐकून व्हाल हैराण

अनेक ठिकाणी अजूनही लसीबाबत (Vaccine) गैरसमज आहेत आणि याचा परिणामही पाहायला मिळत आहे. असंच एक प्रकरण आता मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) राजगडमधून समोर आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 25 जून : कोरोना विषाणूपासून (Coronavirus) स्वतःचा बचाव करण्यासाठी शहरांपासून गावांपर्यंत लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेला वेग देण्यात आला आहे. लोकांमध्येही याबाबत जागरुकता आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी अजूनही लसीबाबत (Vaccine) गैरसमज आहेत आणि याचा परिणामही पाहायला मिळत आहे. असंच एक प्रकरण आता मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) राजगडमधून समोर आलं आहे. जिल्ह्यातील पाटन कला गावातील एक युवक लसीपासून वाचण्यासाठी झाडावर चढला. भारतीय कोरोना लशीमुळे ब्राझीलमध्ये पेटलं वादळ; नेमकं तिथं असं काय घडलं? हा युवक तेव्हापर्यंत खाली उतरला नाही, जोपर्यंत लसीकरण केंद्रावरील लस संपली नाही. गावात राहाणाऱ्या कंवरलालला लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी बोलवलं जात होतं. कंवरलालच्या पत्नीला गावातील लोकांनी लस घेण्यासाठी तयार केलं आणि ते लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचले. या गोष्टीची माहिती कंवरलालला मिळतचा तो पत्नीची आधार कार्ड घेऊन पळाला आणि एका झाडावर चढला. चीनमधील सुरुवातीच्या कोरोना रुग्णांचा डेटा गायब; समोर आली महत्त्वाची माहिती कंवरलालला अशी भीती आहे, की लस घेतल्यामुळे ताप येतो आणि नंतर त्रास होतो. याच कारणामुळे त्यानं स्वतःही लस घेतली नाही आणि आपल्या पत्नीलाही घेऊ दिली नाही. पाटन कला गावात लसीकऱणाबाबत लोकांमध्ये जागरुकता पाहायला मिळत आहे. लस घेण्यासाठी मोठ्या संख्येनं लोकं येत आहेत. बीएमओ डॉक्टर राजीव हरिऔध यांनी सांगितलं, की जो व्यक्ती घाबरून लस घेण्यास नकार देत आहे, त्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. आमची टीम त्याच्या घरी त्याला समजावण्यासाठी जाईल आणि लसीकरणाबाबत त्याला जागरुक करेल. यानंतर तो युवकही लस घेईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात