जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Jalgaon Update : Covid क्वारंटाइन सेंटरमधून 15 रुग्ण फरार; जिल्ह्यात पोलिसांची धावाधाव

Jalgaon Update : Covid क्वारंटाइन सेंटरमधून 15 रुग्ण फरार; जिल्ह्यात पोलिसांची धावाधाव

Jalgaon Update : Covid क्वारंटाइन सेंटरमधून 15 रुग्ण फरार; जिल्ह्यात पोलिसांची धावाधाव

या क्वारंटाइन सेंटरमध्ये एकूण 50 रुग्ण होते, त्यापैकी 15 रुग्णांनी येथून पळ काढला आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

जळगाव, 15 मार्च : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनो रुग्णांची 15 हजारांचा टप्पा पार केला आहे. राज्यात कोरोनाचा कहर असताना नागरिक मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून येत आहे. असाच एक प्रकार जळगावातील जामनेर येथून समोर आला आहे. जामनेर येथील एका क्वारंटाइन सेंटरमधून 15 रुग्ण पळाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती कळताच क्वारंटाइन सेंटरमध्ये एकच गोंधळ उडाला. यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनय सोनावणे यांनी जामनेर पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार नोंदवली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांची धावाधाव सुरू झाली आहे. (Jalgaon Update: 15 patients abscond from Covid Quarantine Center; Police raid in the district) जळगाव जिल्ह्यातील जामनेर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असूनदेखील जामनेर येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांचं मात्र कोविड सेंटरकडे दुर्लक्ष होत आहे. जामनेर पळासखेडा येथील कोविड सेंटरमधील दाखल कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची हेळसांड होत असून तीन दिवसापूर्वी कोविड सेंटरमध्ये दाखल अपंग रुग्णांची देखील प्रकृती खालावली आहे. या तीन दिवसात त्यांची साधी विचारपूसही कोणत्याच डॉक्टरांनी केली नसल्याचे या रुग्णाने सांगितले. या कोविड सेंटरमध्ये सकाळ-संध्याकाळ डॉक्टर नर्स व्हिजिटला येतात, परंतु फक्त रुग्णांची हजेरी घेण्यासाठी.. रुग्णांच्या तपासणीसाठी वापरण्यात येणारे उपकरण हे बंद स्थितीत असतानासुद्धा रुग्णांचे दैनंदिन अहवाल कागदोपत्री पूर्ण असल्याचे येथील रुग्णांच्या तोंडून समजत आहे.

जाहिरात

हे ही वाचा- VIDEO : एकाच्याही चेहऱ्यावर नव्हता मास्क;कोरोनाच्या कहरात नागपुरात उत्साहात वरात त्याच बरोबर रुग्णांच्या आहाराबाबत म्हणा किंवा सेंटरमधील स्वच्छतेबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता सर्व अधिकारी कर्मचारी एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडत आहेत. त्यामुळे रूग्णांच्या गैरसोयींमुळे आणि वारंवार तक्रार करून देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या संतप्त रुग्णांनी अखेर सेंटर मधून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण खुलेआम फिरणार का आणि फिरणार तर यामुळे जर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली तर याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या क्वारंटाईन सेंटरमध्ये सुमारे 50 रूग्ण दाखल होते, त्यापैकी पंधरा रुग्ण सुविधांच्या अभावाची कारणे देत या ठिकाणाहून फरार झाले आहेत. या फरार रुग्णांवर गुन्हा दाखल करून त्यांचा तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात