मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Black Fungusच्या रुग्णांना मोठा दिलासा, भारतात Zydus Cadila आणि TLC उपलब्ध करणार औषध

Black Fungusच्या रुग्णांना मोठा दिलासा, भारतात Zydus Cadila आणि TLC उपलब्ध करणार औषध

झायडस कॅडिला (Zydus Cadila) आणि टीएलसी (TLC) या तैवानच्या (Taiwan) औषधनिर्मिती कंपनीने दिलासादायक घोषणा केली आहे. ब्लॅक फंगसवर भारतात औषध उपलब्ध करून देण्याच्या करारावर त्यांनी स्वाक्षरी केली आहे

झायडस कॅडिला (Zydus Cadila) आणि टीएलसी (TLC) या तैवानच्या (Taiwan) औषधनिर्मिती कंपनीने दिलासादायक घोषणा केली आहे. ब्लॅक फंगसवर भारतात औषध उपलब्ध करून देण्याच्या करारावर त्यांनी स्वाक्षरी केली आहे

झायडस कॅडिला (Zydus Cadila) आणि टीएलसी (TLC) या तैवानच्या (Taiwan) औषधनिर्मिती कंपनीने दिलासादायक घोषणा केली आहे. ब्लॅक फंगसवर भारतात औषध उपलब्ध करून देण्याच्या करारावर त्यांनी स्वाक्षरी केली आहे

नवी दिल्ली, 27 मे: कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट (Second Wave of Coronavirus) किंचितशी ओसरतेय असं वाटत असतानाच देशात ब्लॅक फंगसच्या (Black Fungus) रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्यावर उपचारांसाठी आवश्यक असलेल्या औषधाच्या इंजेक्शनची देशात कमतरता आहे. या पार्श्वभूमीवर, झायडस कॅडिला (Zydus Cadila) आणि टीएलसी (TLC) या तैवानच्या (Taiwan) औषधनिर्मिती कंपनीने दिलासादायक घोषणा केली आहे. Liposomal Amphotericin B हे औषध ब्लॅक फंगस अर्थात म्‍यूकरमायकोसिसच्या (Mucormycosis) उपचारांसाठी वापरलं जातं. त्याची भारतात विक्री करण्यासंदर्भातल्या करारावर या दोन्ही कंपन्यांनी स्वाक्षरी केली असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली.

Liposomal Amphotericin B या औषधाचं ट्रेड नेम अ‍ॅम्‍फोटीएलसी (AmphoTLC) असं आहे. हे औषध टीएलसी कंपनी तैवानमध्ये नॉन-एक्सक्लुझिव्ह बेसिसवर तयार करून भारतात विक्रीसाठी झायडस कंपनीला त्याचा पुरवठा करेल, असं करारामध्ये ठरलं आहे. त्यानंतर झायडस कंपनी भारतात त्याचा पुरवठा आणि विक्री करणार आहे.'कॅडिला हेल्थकेअर'चे व्यवस्थापकीय संचालक शर्विल पटेल (Sharvil Patel) यांनी सांगितलं, की भारतात सध्या ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर उपचारांसाठी औषधांची कमतरता भासते आहे. त्यामुळे झायडस कंपनी तातडीने औषधाची उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न करत आहे. कारण प्रभावी औषधोपचारांशिवाय त्यातून बाहेर येणं शक्य नाही.

हे वाचा-पहिला डोस कोविशील्ड, दुसरा कोवॅक्सिन; आरोग्य मंत्र्यांच्याच जिल्ह्यात काय चाललंय

दरम्यान, टीएलसी कंपनीचे अध्यक्ष जॉर्ज येह (George Yeh) यांनी सांगितलं, की त्यांची कंपनी अॅम्फोटीएलसी औषधाचं पहिलं कन्साइन्मेंट लवकरात लवकर भारतात पाठवणार आहे.

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) टीएलसी कंपनीच्या Liposomal Amphotericin B या औषधाच्या विक्रीसाठी केलेल्या न्यू ड्रग अ‍ॅप्लिकेशनला (New Drug Application) मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारतात त्या औषधाच्या विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे देशातला या औषधाचा तुटवडा भरून निघणार असून, जास्तीत जास्त रुग्णांवर वेळेत उपचारांसाठी मदत होणार आहे.

हे वाचा-आईच्या मृत्यूनंतरही कर्तव्यात कसूर नाहीच, रुग्णवाहिका चालकाचं होतंय कौतुक

काळ्या बुरशीमुळे होणारं म्युकरमायकॉसिस हे एक गंभीर फंगल इन्फेक्शन (Fungal Infection) आहे. कोविड-19मुळे प्रतिकारशक्ती (Immunity) कमी झालेल्या व्यक्तींमध्ये या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसून आलं. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, कर्नाटक आदी राज्यांत या संसर्गाचे रुग्ण आढळत असून, त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. म्युकरमायकॉसिसचा संसर्ग झालेल्या काही रुग्णांना दृष्टी गमवावी लागली आहे. संसर्गाचं स्वरूप गंभीर झाल्यास जबड्यावर शस्त्रक्रिया करून तो काढूनही टाकावा लागतो. गेल्या डिसेंबर महिन्यात या संसर्गाचे काही रुग्ण दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये आढळले होते. त्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून पुन्हा या संसर्गाने डोकं वर काढल्याचं दिसत आहे.

First published:

Tags: Corona, Corona spread, Corona updates, Coronavirus, Coronavirus cases