Home /News /coronavirus-latest-news /

पहिला डोस कोविशील्ड तर दुसरा कोवॅक्सिन; खुद्द आरोग्य मंत्र्यांच्याच जिल्ह्यात काय चाललंय?

पहिला डोस कोविशील्ड तर दुसरा कोवॅक्सिन; खुद्द आरोग्य मंत्र्यांच्याच जिल्ह्यात काय चाललंय?

एकाच गावातील तब्बल 20 लोकांना दोन वेगवेगळ्या लसींचे डोस देण्यात आल्यानं आता चांगलीच अडचण निर्माण झाली आहे. पहिला डोस कोविशील्ड लसीचा दिला होता आणि दुसरा डोस कोवॅक्सिनचा देण्यात आला.

    सिद्धार्थनगर, 26 मे : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळं देशात (Corona Second Wave) बिकट स्थिती आहे. सर्वच राज्यांमध्ये मृतांची संख्या वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. यावर जास्तीत-जास्त लसीकरण होणं गरजेचे आहे. मात्र लसीकरणामध्ये (Corona Vaccination) बऱ्याच ठिकाणी सावळा गोंधळ असून काही ठिकाणी एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लसींचे डोस दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत, असाच प्रकार घडला असून एकाच गावातील तब्बल 20 लोकांना दोन वेगवेगळ्या लसींचे डोस देण्यात आल्यानं आता चांगलीच अडचण निर्माण झाली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांच्या आरोग्यावर काही विशेष परिणाम होईलच असं नाही. सर्वांची तब्येत सध्या ठीक आहे. मात्र, घडल्याप्रकारावरून CMO कडून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रतापसिंह यांच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यातच घडल्यानं त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. सर्व 20 जणांना पहिला डोस कोविशील्ड लसीचा दिला होता आणि दुसरा डोस कोवॅक्सिनचा देण्यात आला. केंद्रावरील लस संपल्यानंतर समजला हा प्रकार लस घेण्यासाठी आलेल्या एका नागरिकानं सांगितलं की, आम्हाला अगोदर कोविशिल्ड लसीचा डोस दिला होता आणि दुसरा डोस कोवॅक्सिनचा देण्यात आला. लसीकरण केंद्रावरील लस संपल्यानंतर खरंतर हा प्रकार उघडकीस आला. लस देणाऱ्या कर्मचाऱ्यानं मुख्य डॉक्टरांना जाऊन सांगितलं की, या लोकांना चुकीची लस देण्यात आली आहे. या सर्वांना अगोदर 2 एप्रिल रोजी कोविशिल्ड लस देण्यात आली होती. दुसरा डोस 14 तारखेला कोविशिल्ड ऐवजी कोव्हॅक्सिनचा दिला गेला आहे. हे वाचा -  एकट्या मुलीला करावा लागला आईचा दफनविधी, जेवणाच्या कार्यक्रमाला मात्र 150 हजर उत्तर प्रदेशमध्ये अशाप्रकारे दोन वेगवेगळ्या लसीचे डोस दिल्याचे यापूर्वीही काही प्रकार घडले होते. या प्रकारांवरून आतापर्यंत कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. आरोग्यावर विपरीत परिणाम होणार? येथील मुख्य डॉक्टर पियुष राय यांनी सांगितलं की, अशा प्रकारची घटना होणं दुर्दैवी आहे. सध्या यापैकी कुणालाही त्रास होत नसला तरी अशा प्रकारे वेगवेगळे दोन डोस घेतल्यास थोडासा ताप येणं, शरीरावर चट्टे उठणे, भीती वाटणे असे काही त्रास यामुळे होऊ शकतात. हे वाचा - अंत्यसंस्कारला कोणीच आलं नाही, एकट्या मुलीने केलं सगळं! पण श्राद्धाला मात्र 150 हजर या सर्व प्रकारावरून आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारावर टीका केली जात आहे. या अगोदर शामली येथील तीन महिलांवर कोरोना लसीऐवजी कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणार्‍या रेबीज लसीचे डोस देण्यात आले होते. यातील 70 वर्षीय महिलेला त्रास जाणवू लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona spread, Corona updates, Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या