मराठी बातम्या /बातम्या /देश /

आईच्या मृत्यूनंतरही कर्तव्यात कसूर नाहीच, रुग्णवाहिका चालकाचं होतंय कौतुक

आईच्या मृत्यूनंतरही कर्तव्यात कसूर नाहीच, रुग्णवाहिका चालकाचं होतंय कौतुक

सकाळी 6 वाजता त्यांना कोरोना संसर्गामुळं (Corona Infection) त्यांच्या आईचं निधन झाल्याचे कळविण्यात आले. परंतु, स्वतःच्या मनाला सावरत प्रभात यांनी स्वत:च्या कामाची जबाबदारी अगोदर पूर्ण केली.

  • Published by:  News18 Desk

मैनपुरी, 27 मे : रुग्णवाहिका चालक प्रभात यादव हे गेल्या नऊ वर्षांपासून 108 रुग्णवाहिका सेवांसाठी कर्तव्य बजावत आहेत. प्रभात आपल्या कर्तव्यावर असताना एकदा सकाळी 6 वाजता त्यांना कोरोना संसर्गामुळं (Corona Infection) त्यांच्या आईचं निधन झाल्याचे कळविण्यात आले. परंतु, स्वतःच्या मनाला सावरत प्रभात यांनी स्वत:च्या कामाची जबाबदारी अगोदर पूर्ण केली.

कोरोनाच्या या संक्रमण (Corona in India) काळात लोक त्यांच्या जवळच्या लोकांपासून अंतर ठेवून आहेत. अनेकांना मृत्यूनंतर त्यांच्या प्रियजनांचा खांदाही मिळण्याचंही नशीब राहिलेलं नाही. अशा कोरोना काळातही कोरोना वॉरियर्स स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस सेवा बजावत आहेत. अशीच कहाणी रुग्णवाहिका चालक प्रभात यादव यांची आहे. ते उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील चुरहेला गावचे रहिवासी आहेत.

प्रभात गेल्या नऊ वर्षांपासून 108 सेवांसाठी रुग्णवाहिका चालवत आहेत. ते सध्या मथुरा जिल्ह्यात तैनात आहेत. प्रभात आपल्या कर्तव्यावर असताना सकाळी 6 वाजता त्यांना कळविण्यात आलं की, त्यांच्या आईचे कोरोना संसर्गाने निधन झालं आहे. मात्र, प्रभात यांनी स्वत:च्या मनाला सावरत आपलं कर्तव्य पार पाडलं आणि मग ते आईचे अंत्यसंस्कार करण्यासाठी गेले. प्रभात यांचे वडील आणि भाऊ यांचाही गेल्या वर्षी कोरोनामुळं निधन झालं होतं.

आईवर अंत्यसंस्कार केल्यानंतर प्रभात ताबडतोब आपल्या कर्तव्यासाठी निघाले. मथुरेच्या 102 आणि 108 रुग्णवाहिका सेवांचे प्रोग्राम मॅनेजर अजय सिंह यांनी प्रभात यांना घरीच राहण्यास सांगितले होते. पण प्रभात थांबले नाहीत.

हे वाचा - कधी एअरपोर्टवर काढली पँट तर कधी तरुणीचा खाला मार; या घटनांमुळे चर्चेत आलाय आदित्य नारायण

दुसर्‍या दिवशी दीड वाजता प्रभात परत आले आणि सकाळची शिफ्ट घेतली. प्रभातचे वडील आणि भाऊ गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळं मरण पावले होते. तेव्हाही प्रभात एका दिवसासाठी घरी आले आणि लवकरच कामावर परतले.

हे वाचा - पुरुषांमध्ये सर्वात पहिल्यांदा कोरोना लस घेणाऱ्या 81 वर्षीय आजोबांचं निधन, William Shakespeare यांचा मृत्यू

प्रभात यादव यांच्या कर्तव्यनिष्ठेमुळं सर्वांचीच मने हेलावली आहेत. सध्याच्या कोरोनाच्या संकटात लोक जाणीवपूर्वक घरात राहण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रभात यांनी आईच्या निधनानंतरही लोकांची मदत करण्याचा वसा घेतला आहे. आजही ते अनेक लोकांना दररोज वेळेवर रुग्णालयात पोहोचवून त्यांचा जीव वाचवत आहेत.

First published:

Tags: Corona spread, Corona updates, Coronavirus, Uttar pradesh