नवी दिल्ली, 08 फेब्रुवारी : या वर्षी, 2022 की 2027? कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रकोप कधी संपेल? भारतासह जगभरात कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर प्रत्येकाला हाच प्रश्न पडला आहे. या प्रश्नांवर कोणाकडे उत्तरही नसेल. काही जण यावर एखादी तारीख, कमीत कमी एक महिना किंवा एक वर्ष असे उत्तर देत असतील. पण यावर ठामपणे अंदाज लावता येऊ शकत नाही.
भारतासह काही देशांमध्ये लसीकरणाला (Vaccination Drive) सुरुवात देखील झाली आहे. या लशीचे दोन डोस चार आठवड्यांच्या अंतराने दिले जातात. कोट्यवधी लोकांना दोन डोस देण्यासाठी वेळ लागू शकतो. कारण लशीचे उत्पादन (Vaccine Production) देखील महत्त्वाचा घटक आहे. यावरून जगातून कोरोना कधी संपेल याचं उत्तर लस कॅल्क्युलेटरवरच अवलंबून आहे.
अमेरिकेतील अँथनी फॉकी यांच्या मते, 'जोपर्यंत 70 ते 85 टक्के लोकसंख्येला लस दिली जात नाही तोपर्यंत पूर्णपणे या महासाथीचा प्रकोप संपला असं म्हणता येणार नाही.' तर दुसरीकडे जगभरात लस ज्या पद्धतीने दिली जात आहे याच्याशी संबंधीत डेटाचे सर्वात मोठे सेंटर एका मीडिया हाऊसने तयार केले आहे. त्यांच्यानुसार आकडेवारी काय आहे आणि त्यांचा अंदाज काय आहे? हे जाणून घेऊया.
लसीकरण कसे होत आहे?
इस्त्राईलमध्ये सर्वात वेगाने लसीकरण सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. अवघ्या दोन महिन्यांत याठिकाणी 75 टक्के लोकसंख्येला लस देण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण दुसरीकडे अमेरिका आणि फ्रान्ससारख्या मोठ्या देशात लसीकरणाचा कार्यक्रम जवळपास ठप्प झाला आहे. याठिकाणी पुरवठा साखळी, उत्पादन आणि भ्रष्टाचारात कोरोनावरील लस अडकली आहे. याठिकाणी लसीकरणाचा वेग खूप कमी आहे. तर भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशामध्ये एक अब्जाहून अधिक लोकांना लस देण्याचं उद्दिष्ट आहे.
हे वाचा - इंग्रज घेणार पुणेरी कोरोना लस? भारतातील Covisheild यूकेमध्ये जाण्याची शक्यता
या सर्व गोष्टींना लक्षात घेता डेटाबेसच्या आकडेवारीवरुन जगभरातील एक सरासरी तयार केली जात आहे की कोरोनावरील लस लोकांपर्यंत कोणत्या वेगाने पोहोचत आहे. यानुसार तयार केलेल्या विश्लेषणाच्या आधारे हे देखील पाहिलं जात आहे की 75 टक्के लोकसंख्येला कधीपर्यंत लस मिळेल.
लसीकरणाच्या वेगात का आणि कशी घट होते आहे?
उदाहरण द्यायचं म्हटल्यास, न्यूयॉर्कमध्ये हिवाळ्यामुळे अनेक नागरिकांना लस दिली जाऊ शकत नाही. त्यामुळे आता लसीकरण उद्दिष्टामध्ये वाढ करण्यात आली असून 17 महिन्यांमध्ये लसीकरण पूर्ण होईल असं सांगण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे कॅनडामध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी झालं आहे कारण याठिकाणी लशीची खेप पोहचण्यास उशीर होत आहे. जर कॅनडामध्ये लसीकरणाची गती आदर्श मानली तर 75 टक्के लोकसंख्येला लस देण्यास 10 वर्षे लागतील. फक्त कॅनडा नाही तर सर्वांसाठीच हा सूचक आकडा आहे. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, आतापर्यंत काही देश 100 पेक्षा जास्त करारांसह 8.5 अब्ज लशीच्या डोसचं बुकिंग झालं आहे. तर फक्त एक तृतीयांश देशांमध्ये लसीकरण सुरू झालं आहे.
कधीपर्यंत पूर्ण होईल लसीकरण?
सध्या ही वस्तुस्थिती आहे की डेटाबेसमध्ये ज्या देशांच्या लसीकरणावर लक्ष ठेवलं जात आहे, त्यामधील 20 टक्के देशांमध्ये लसीकरणाच्या दरासंदर्भातील आकड्यांमध्ये सातत्य किंवा अचूक माहिती मिळत नाही. अशामध्ये आता जी लस उपलब्ध आहे त्याचे दोन डोस दिल्यानंतरच महासाथीवर परिणाम होत आहे. या सर्व गोष्टींना लक्षात घेता ब्लूमबर्गच्या डेटाबेसने एक विश्लेषण तयार केलं आहे.
हे वाचा - दिलासादायक! मे 2020 नंतर देशात पहिल्यांदाच कोरोना मृत्यूंमध्ये मोठी घट
जर लसीकरण या वेगाने चालू राहिले तर संपूर्ण जगाला ही लस मिळण्यास 7 वर्षे लागतील. याचा अर्थ असा होतो की, 7 वर्षांत सुमारे 75% लोकसंख्येला लस मिळालेली असेल, तेव्हा एक ग्लोबल हर्ड इम्युनिटी विकसित होईल आणि कोविड- 19 नष्ट होईल. पण इथे आणखी एक प्रश्न आहे.
हर्ड इम्युनिटीवर वाद
विज्ञानातील तज्ज्ञ सुद्धा अजूनही हर्ड इम्युनिटीबद्दल एकमत नाहीत. 75 टक्क्यांचा आकडा हर्ड इम्युनिटी निर्धारित करतो? काही तज्ज्ञांच्या मते यापेक्षा कमी लोकसंख्येच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती तयार झाली तर पुरेशी आहे. तर दुसरीकडे लशीच्या दीर्घकालीन परिणामांबद्दल अद्याप परिस्थिती स्पष्ट झाली नाही. जर ही आकडेवाडी एक उद्दिष्ट म्हणून घेतली गेली तर सध्यस्थितीत आपण उद्दिष्टापासून सहा वर्षे मागे आहोत.