मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

दिलासादायक! मे 2020 नंतर देशात पहिल्यांदाच कोरोना मृत्यूंमध्ये मोठी घट

दिलासादायक! मे 2020 नंतर देशात पहिल्यांदाच कोरोना मृत्यूंमध्ये मोठी घट

कोरोनाचं आव्हान अजूनही संपलेलं नाही. देश सर्व ताकदीनिशी कोरोनाशी लढा देत असताना आता दिलासादायक बातमी आली आहे

कोरोनाचं आव्हान अजूनही संपलेलं नाही. देश सर्व ताकदीनिशी कोरोनाशी लढा देत असताना आता दिलासादायक बातमी आली आहे

कोरोनाचं आव्हान अजूनही संपलेलं नाही. देश सर्व ताकदीनिशी कोरोनाशी लढा देत असताना आता दिलासादायक बातमी आली आहे

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : भारतात (India) कोरोनाची लस (corona vaccine) उपलब्ध झाली असली तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. मात्र कोरोना व्हायरस संक्रमणाबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतात आज रविवारी 1 मेपासून आजवरच्या सर्वात नीचांकी मृत्यूची (deaths due to corona) नोंद करण्यात आली. आज दिवसभरात 24 तासात भारतात केवळ 78 लोकांचा मृत्यू झाला. सरकारच्या आकडेवारीनुसार (government data) आजवर कोरोनामुळं झालेल्या मृत्यूची संख्या 1.5 लाख इतकी आहे. दरम्यान कोरोनाच्या केसेसची संख्या आता 1.08 कोटी इतकी झाली आहे. काल शनिवारी देशभरातून समोर आलेल्या 12,059 केसेसची यात भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (union health ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील सक्रिय केसेसची (active cases) संख्या आता 1.48 लाख इतकी आहे. हे एकूण केसेसच्या 1.37 टक्के आहे. हे ही वाचा-यूट्यूबवर येण्यासाठी तरुणाची हत्या करुनही पोलिसांची वाट पाहत राहिले 4 आरोपी एकगठ्ठा नव्या केसेस केरळ आणि महाराष्ट्रात नोंदवण्यात आल्या. या केसेस अनुक्रमे 5942 आणि 2768 इतक्या आहेत. केवळ 3349 इतक्या केसेस उरलेल्या देशात नोंदवण्यात आल्या. शनिवारी 2.2 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना देशातल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत लस देण्यात आली. भारतातील लसीकरण मोहीम ही जागतिक पातळीवर सर्वात मोठी असल्याचं बोललं जात आहे. सध्या जवळपास 56 लाख 'कोरोना वॉरियर्स'ना लस देऊन झाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी शनिवारी जाहीर केलं, की भारत सध्या आणखी सात लसी विकसित करतो आहे. याशिवाय प्रत्येक भारतीयाला लस उपलब्ध व्हावी यासाठीची यंत्रणाही विकसित केली जाते आहे. हर्ष वर्धन म्हणाले, की आपण केवळ दोन लसींवर अवलंबून नाही. देश अजून सात लसींवर काम करतो आहे. पुढेही अजून लसींवर काम केलं जाणार आहे. कारण भारत हा अतिशय प्रचंड देश आहे. आपल्याला अजून संशोधनाची गरज लागणार आहे.
First published:

Tags: Corona virus in india, Covid19, Patient death

पुढील बातम्या