नवी दिल्ली, 29 मे: यूके (United Kingdom) च्या डोक्यावर कोरोनाच्या (Corona Virus) तिसऱ्या लाटेचं संकट आहे. यूकेमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढताना दिसतोय. ही वाढ B.1.617.2 व्हेरिएंटमुळे होत असल्याचं समजतंय. नवीन प्रकारामुळे यूकेमध्ये तिसर्या लाटाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, चांगल्या व्हॅक्सीन (Corona Vaccination) चं चांगलं कव्हरेज असतानाही हा व्हेरिएंट वेगानं पसरतोय. यूकेत आतापर्यंत 3.8 कोटी लोकांनी व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे. तर 2.4 कोटी लोकांनी दोन्ही डोस घेतले आहे. मात्र देशात रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या ही वेगानं वाढतेय. यूकेत B.1.617.2 हा व्हेरिएंट वेगानं पसरताना दिसतोय. या देशात गेल्या आठवडाभरात रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नॉर्थ- वेस्टमध्ये हा आकडा 25 टक्के आहे. तर स्कॉटलँडमध्ये हा आकडा त्याहून जास्त आहे. स्कॉटलँडच्या एनएचएस रुग्णालयाचे डॉ. अविरल वत्स यांनी सांगितलं, लॉकडाऊन उघडल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आधीच होती. तर जूनमध्ये अनलॉकचा शेवटचा टप्पा असणार आहे. हेही वाचा- चिपळूणकरांची चिंता वाढवणारी बातमी, ग्रामीण भाग ठरतोय हॉटस्पॉट पुढे डॉ. वत्स यांनी सांगितलं, व्हॅक्सीनमुळे ज्येष्ठांमधली संसर्गाचा दर आणि प्रकरणे कमी झाली आहेत. बऱ्याच वृद्धांनी व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतलेत. रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र पहिल्या लाटेच्या तुलनेत आकडा बराच कमी आहे. तसंच रुग्णांची आणि कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही 60 ते 70 टक्क्यांनी कमी आहे. भारताला चिंता करण्याची गरज? जर आपण यूकेचा ट्रेंड पाहिल्यास तिथे तरुणांमध्ये संसर्ग झपाट्यानं पसरत आहे. आधीच तिसऱ्या लाटेत कोरोनाचा जास्त धोका हा तरुणांना असल्याची चिंता भारतातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे व्हॅक्सीनचा कमी वेग ही भारतासाठी एक चिंतेची बाब ठरू शकते. हेही वाचा- VIDEO: पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिला आरोपीचा थरारक व्हिडिओ सरकारच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 20 कोटींहून अधिक लोकांनी व्हॅक्सीनं घेतलं. मात्र केवळ 4 कोटी लोकांना या व्हॅक्सीनचे दोन्ही डोस मिळाले आहेत. म्हणजेच देशातल्या केवळ 3.1 टक्के लोकांना व्हॅक्सीचे दोन्ही डोस देण्यात आलेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.