बीजिंग, 29 मे : कोरोनाव्हायरस (Coronavirus) कुठून आला? तो चीनच्या (Coronavirus in china) लॅबमध्येच तयार झाला का? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं अद्यापही मिळालेली नाही. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाची उत्पत्ती कशी झाली, याचा शोध घेत आहे. बहुतेकांनी कोरोना हा चीनमधूनचा (China) आला, प्रामुख्याने तो चीनच्या वुहान लॅबमध्येच (Coronavirus in china wuhan lab) तयार करण्यात आला, अशी शक्यता व्यक्त केली आहे. नुकतंच ब्रिटिश आणि नॉर्वेच्या शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे आणि याबाबत पुरावा दिला आहे.
ब्रिटिश प्राध्यापक एंगस डल्गलिश आणि नॉर्वेतील शास्त्रज्ञ डॉ. सोरेनसन यांनी कोरोनाव्हायरस चाीनच्या लॅबमध्ये तयार करण्यात आला असा दावा केला आहे. कोरोनाव्हायरसच्या सॅम्पलमध्ये युनिक फिंगरप्रिंट मिळाले आहेत, जे लॅबमध्ये व्हायरसशी छेडछाड केल्यानंतरच शक्य आहेत. असं या संशोधकांनी म्हटलं आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार या दोन्ही शास्त्रज्ञांनी आपला रिपोर्टही दिला आहे.
रिपोर्टमध्ये दिलेल्या संशोधनानुसार चिनी शास्त्रज्ञांनी व्हायरसला वुहान लॅबमध्ये गेन ऑफ फंक्शन प्रोजेक्टवर काम करत बनवलं आहे. गेन ऑफ फंक्शन अमेरिकेत अस्थायी स्वरूपात बॅन आहे. यामध्ये नैसर्गिक निर्मित व्हायरसला अधिक संसर्गजन्य बनवण्यासाठी प्रयोगशाळेत त्याची निर्मिती केली जाते. जेणेकरून माणसांवर त्याचा जास्त परिणाम होईल.
हे वाचा - कोरोना, ब्लॅक-व्हाईट-येलो फंगसशी लढता लढता टॉक्सिमियाने घेतला रुग्णाचा जीव
रिसर्चनुसार चिनी शास्त्रज्ञांनी गुहेतील वटवाटळांमधील नैसर्गिक कोरोनाव्हायरसचा आधार घेऊन त्याला एक नवीन स्पाइक जोडला, परिणामी अधिक संसर्गजन्य आणि जीवघेणा कोविड19 तयार झाला. कोविड19 मध्ये नैसर्गिक कोरोनाव्हायरसचे कोणतेही जुने प्रमाणिक अंश मिळत नाहीत. सोबतच लॅबमध्ये व्हायरससोबत छेडछाड केल्याची माहिती होऊ नये, यासाठी रिव्हर्स इंजिनीअरिंग केली आहे.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, प्रा. एंगस डल्गलिश यांनी सांगितलं, आम्हाला वाटतं रेट्रो इंजिनीअरिंगमुळे व्हायरस तयार करण्यात आला होता. त्यानंतर त्याला बदलण्यात आलं आणि त्याला असं सिक्वेंस देण्यात आलं, जे कित्येक वर्षांपूर्वीच्या स्थितती होता. वुहान लॅबमधील पुरावे नष्ट केल्याबाबत शास्त्रज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या शास्त्रज्ञांना याची माहिती द्यायची होती ते गायब झाले किंवा आतापर्यंत काही बोलले नाही आहेत.
हे वाचा - आता राज्यांना स्वतः कंपनीकडून विकत घ्यावं लागणार रेमडेसिवीर; केंद्र नाही करणार..
याआधी जानेवारी, 2021 मध्ये वुहानमध्ये गेलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या टीमने आपल्या रिपोर्टमध्ये कोरोनाव्हायरस हा नैसर्गिकरित्या निर्माण झालेला आहे, असंच म्हटलं होतं. या टीमने इतर थिअरी स्वीकारण्यास नकार दिला होता. दरम्यान अमेरिकेतील राष्ट्रपती जो बाइडन यांनी कोरोनाव्हायरसची उत्पत्ती कशी झाली, याची माहिती मिळवण्याच्या सूचना केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Corona, Corona spread, Coronavirus, Wuhan