Home /News /coronavirus-latest-news /

भारतात येऊन धडकतेय कोरोनाची दुसरी लाट, लसीकरणासाठी Sanjeevani Campaign ठरेल देशासाठी फायद्याचे

भारतात येऊन धडकतेय कोरोनाची दुसरी लाट, लसीकरणासाठी Sanjeevani Campaign ठरेल देशासाठी फायद्याचे

नेटवर्क18 (Network18) ची नवीन मोहीम ‘संजीवनी - एक शॉट ऑफ लाइफ’ (Sanjeevani – A Shot Of Life) सुरू होत आहे. देशातील कानाकोपऱ्यात जास्तीत जास्त संक्रमणग्रस्त जिल्ह्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या मोहिमेची रचना केली गेली आहे जेणेकरुन देशाच्या सर्व भागात लसीकरण प्रयत्न सुरू होतील.

पुढे वाचा ...
    मुंबई, 07 एप्रिल: देशातील अनेक राज्यात आणि शहरात कोव्हिड-19 ची आकडेवारी (Coronavirus Cases in India) या पँडेमिकची (COVID-19 Pandemic) सुरुवात झाल्यापासून वाढते आहे. इतर देशांकडून धडा घेण्यासारखे काही असल्यास, आपल्याला माहित आहे की यावेळी संक्रमण आणि मृत्यूची संख्या पहिल्या लाटेच्या तुलनेत जास्त असेल. त्याचप्रमाणे दुसर्‍या लाटेचा प्रसार रोखण्याचा एकमात्र प्रभावी मार्ग म्हणजे सर्वाधिक लोकसंख्येपर्यंत लसीकरण (Corona Vaccination) शक्य तितक्या लवकर पोहोचवणे. अशावेळी नेटवर्क18 (Network18) ची नवीन मोहीम ‘संजीवनी - एक शॉट ऑफ लाइफ’ (Sanjeevani – A Shot Of Life) उदयास आली आहे. देशातील कानाकोपऱ्यात जास्तीत जास्त संक्रमणग्रस्त जिल्ह्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या मोहिमेची रचना केली गेली आहे जेणेकरुन देशाच्या सर्व भागात लसीकरण प्रयत्न सुरू होतील. कोरोनाची दुसरी लाट संजीवनी मोहिमेबाबत बोलण्यापूर्वी, लसीकरण ही काळाची गरज का आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांनी पुष्टी केली आहे की, भारतात फास्ट-म्युटेटिंग डबल-स्ट्रेन कोव्हिड व्हेरिएंट आहे.  यूके, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील याठिकाणच्या व्हेरिएंटचे अहवाल देखील आहेत जे त्यांच्या संक्रमणाच्या उच्च दरासाठी ओळखले जातात. कोव्हिड संक्रमणाबाबतीत योग्य वर्तणुकीचा अभाव आणि भारतात लसीकरण मोहिमेची धीमी गती यामुळे फेब्रुवारीच्या मध्यावर देशात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave of Corona) आली आणि या लाटेने अल्पावधीतच लाखो लोकांना वेढले आहे. (हे वाचा-भारतातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम 'संजीवनी' मध्ये सोनू सूद होणार सहभागी) कोरोना लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात ही एकंदरित समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी भारताची प्रशंसा केली गेली आणि अर्थव्यवस्थेच्या विक्रमी संकुचिततेनंतर आपण देशात हळूहळू उद्योगधंदे उघडण्यास सुरुवात केली. पण दुसऱ्या लाटेने देशाच्या अर्थव्यवस्थेच्या या नाजूक रिकव्हरीला धोका निर्माण केला आणि त्याबरोरच देशभरात लॉकडाऊन होण्याचा धोका वाढला आहे. बहुतेक राज्य सरकारांकरिता संपूर्ण लॉकडाउन हा एकमेव पर्याय शिल्लक राहण्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. असे असले तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत एक मोठा फरक आहे, गेल्यावर्षी पँडेमिकशी लढण्यासाठी केवळ लॉकडाऊन हा एकमेव पर्याय होता. मात्र आता पँडेमिकला प्रभावीपणे हरवण्यासाठी आपल्याकडे लस उपलब्ध आहे. काय आहे संजीवनी मोहीम? केंद्र आणि राज्य सरकारे कोव्हिड-19 विरोधात देशभरात लोकांचे लसीकरण करत आहेत, भारतासारख्या विशाल प्रदेशात पसरलेल्या मोठ्या लोकसंख्येमध्ये ते लसीकरण करत आहे. अशावेळीसंजीवनी मोहीम उदयास आली आहे. नेटवर्क 18 ग्रुपच्या मोहिमेला 'संजीवनी - अ शॉट ऑफ लाइफ' (Sanjeevani - A Shot of Life) असं नाव देण्यात आलं आहे. फेडरल बँकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमाच्या अंतर्गत या मोहिमेला सहाय्य करण्यात येणार आहे. यासोबतच अपोलो 24/7 अंतर्गत देशातील सर्वात जास्त संक्रमणग्रस्त जिल्ह्यांत लसीकरणाच्या संबंधित काम करण्यात येणार आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत Network 18 ग्रुपच्या भारतातील सर्वात मोठ्या 'संजीवनी' (Sanjeevani) लसीकरण मोहिमेत अभिनेता सोनू सूद सहभागी झाला आहे. अभिनेता सोनू सूदने या मोहिमेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून स्वाक्षरी केली आहे.  7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनी (World Health Day) या मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वी तो अपोलो हॉस्पिटलमधून लस घेताना दिसतील. (हे वाचा-'संजीवनी-अ शॉट ऑफ लाईफ'Network18 आणि Federal Bankची कोरोना लसीकरण जनजागृती मोहिम) अमृतसरमध्ये होणा या लाँच सोहळ्यात खास ‘संजीवनी गाडी’ला हिरवा झेंडा दाखवला जाईल.  ही गाडी फेडरल बँकेने दत्तक घेतलेल्या पाच जिल्ह्यांमधील सुमारे 1500 गावांना भेट देईल ज्याठिकाणी जनजागृती उपक्रम राबवले जातील. यात देशात कोरोनामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या अमृतसर, नाशिक, इंदूर, गुंटूर आणि दक्षिण कन्नड या जिल्ह्यांचा समावेश आहे. नेटवर्क 18 ची ‘संजीवनी - एक शॉट ऑफ लाइफ’ही मोहीम हा पुरावा आहे की भारत  सरकार कॉर्पोरेट्स, एनजीओ आणि रुग्णालयांवर पुढाकार घेण्यासाठी अवलंबून राहू शकते आणि भारतात व्हॅक्सिनेशन ड्राइव्ह वाढू शकते. अशाप्रकारे, लस लोकप्रिय झाल्यामुळे तसंच स्वस्त आणि सहजपणे उपलब्ध झाल्यामुळे आपल्याला हर्ड इम्युनिटी (herd immunity) लवकर गाठता येईल. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या कोणत्याही भीतीशिवाय आपण आपल्या सामान्य जीवनात परत जाऊ शकतो. संजीवनीसारखे उपक्रम फक्त महत्वाचे आणि अत्यावश्यक नसून ते काळाची गरज आहे. या मोहिमेचे यश पाहण्यासाठी आणि येणाऱ्या काही दिवसांत संपूर्ण देशात ही मोहीम सुरू झालेली पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus, Covid-19, Health, Immun, Uk corona variant, Wellness, World health day

    पुढील बातम्या