• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • 'संजीवनी - अ शॉट ऑफ लाईफ' Network18 आणि Federal Bankची एकत्रित कोरोना लसीकरण जनजागृती मोहिम

'संजीवनी - अ शॉट ऑफ लाईफ' Network18 आणि Federal Bankची एकत्रित कोरोना लसीकरण जनजागृती मोहिम

'संजीवनी- अ शॉट ऑफ लाइफ' (Sanjeevani - A Shot of Life) असं या कोरोनाप्रतिबंधक लसीकरणासंदर्भात जनजागृती मोहिमेचं नाव असून, फेडरल बँकेच्या (Federal Bank) कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत या मोहिमेला अर्थसाहाय्य केलं जाणार आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 5 एप्रिल : येत्या जागतिक आरोग्य दिनी म्हणजेच 7 एप्रिल रोजी नेटवर्क 18 तर्फे (Network18) कोरोनाप्रतिबंधक लसीकरणासंदर्भात जनजागृती मोहीम (Awareness) सुरू केली जाणार आहे. 'संजीवनी- अ शॉट ऑफ लाइफ' (Sanjeevani - A Shot of Life) असं या मोहिमेचं नाव असून, फेडरल बँकेच्या (Federal Bank) कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत या मोहिमेला अर्थसाहाय्य केलं जाणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून कोविड-19 लशीची, लसीकरणासंदर्भातली (Vaccination) महत्त्वाची सगळी माहिती, तसंच लस घेण्याचे फायदे प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 'फर्स्ट पोस्ट'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 16 जानेवारी 2021 रोजी संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. आरोग्य कर्मचाऱ्यांसह तीन कोटी कोरोना योद्ध्यांना या पहिल्या टप्प्यात लस देण्यात आली. देशातली पहिली लस घेण्याचा मान एका स्वच्छता कर्मचाऱ्याला मिळाला. 1 मार्चपासून सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील सर्वांना, तसंच 45 ते 60 या वयोगटातल्या, विविध व्याधी असलेल्या व्यक्तींचं लसीकरण करण्याची सुरुवात करण्यात आली. तसंच, 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांनाच लस घेण्याची मुभा देण्यात आली आहे. भारतात कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही लशींचा वापर लसीकरणासाठी केला जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लशींचे साडेसात कोटींहून अधिक डोस भारतात देण्यात आले आहेत. नेटवर्क 18 (Network18) आणि फेडरल बँक (Federal Bank) यांची 'संजीवनी' ही मोहीम अमृतसरमधून सुरू होणार असून, त्या वेळी या मोहिमेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) उपस्थित राहणार आहे. या मोहिमेची सुरुवात सोनू सूद स्वतः लस घेऊन करणार आहे.

(वाचा - Break The Chain : ठाकरे सरकारकडून नियमावली जाहीर;ऑफिस ते सोसायटी, काय होणार बदल?)

भारतातली साधारणतः 66 टक्के लोकसंख्या ग्रामीण किंवा दुर्गम भागात राहते. त्यामुळे सर्वांच्या लशीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण करणं अवघड आहे. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक भारतीयाला ही लस मिळावी आणि देश पुन्हा पूर्वपदावर यावा, यासाठी नेटवर्क 18 प्रयत्न करणार आहे. या मोहिमेचा भाग म्हणून भारतातले सर्वांत प्रभावित 5 जिल्हे दत्तक घेतले जाणार आहेत. त्यात अमृतसर, इंदूर, नाशिक, गुंटूर आणि दक्षिण कन्नड यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील विविध गावांमध्ये लसीकरण मोहिम राबवल्या जाणार आहेत. या मोहिमेची सुरुवात करताना 'संजीवनी की गाडी'ला (Sanjeevani Ki Gaadi) हिरवा झेंडा दाखवला जाईल. ही गाडी कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या विविध भागांत फिरेल, गैरसमज दूर करून लोकांना खरी आणि योग्य माहिती देईल आणि लोकांमध्ये लसीकरणाबद्दल जनजागृती करेल. 9 महिने चालणार असलेल्या या मोहिमेत सहभागी होऊन 'संजीवनी' मोहीम यशस्वी करावी, असं आवाहन नेटवर्क 18 आणि फेडरल बँकतर्फे करण्यात आलं आहे.
First published: