Home /News /coronavirus-latest-news /

चिंताजनक बातमी, देशातील कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर

चिंताजनक बातमी, देशातील कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर

फोटो-प्रतिकात्मक

फोटो-प्रतिकात्मक

सध्या देश कोरोना व्हायरस (Corona Virus) सारख्या महामारीचा सामना करत आहे. दिवसेंदिवस देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे.

    नवी दिल्ली, 22 मे: सध्या देश कोरोना व्हायरस (Corona Virus) सारख्या महामारीचा सामना करत आहे. दिवसेंदिवस देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली होती की, देशानं दिवसाला 4 लाख रुग्ण वाढीचा आकडाही पाहिला आहे. यंदाचा मे महिना हा या महामारी (Pandemic)साठीचा सर्वात घातक महिना ठरला आहे. केवळ 21 दिवसात देशात 70 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले. मृतांच्या आकडेवारीतही मे महिना भयानक ठरला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटे (Second Wave)नं जास्तच कहर माजवला. काल मे महिन्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 70 लाखांच्यावर गेला आहे. या महिन्यात आतापर्यंत 71.3 लाखांहून अधिक रुग्ण सापडलेत. यावेळी 83 हजार 135 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात हा आकडा 48 हजार 768 इतका होता. एप्रिलमध्ये एकूण 69.4 लाख प्रकरणांची नोंद झाली होती. हेही वाचा- लॉकडाऊन संपायला अवघे शेवटचे 9 दिवस, काय होणार 1 जूननंतर? पहिल्या लाटेच्या तुलनेत आताची परिस्थिती भयानक टाइम्स ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी 26.2 लाखांच्या आसपास रुग्ण आढळून आले होते. तर मृतांची संख्या 33.3 हजार इतकी होती. ऑगस्ट 2020 मध्ये संसर्गाचे 19.9 लाख प्रकरणांची नोंद झाली होती. तर मृतांचा आकडा 28.9 हजार इतका होता. हेही वाचा- देशाच्या भल्यासाठी रोहित पवार सरसावले, केंद्र सरकारला दिला 'हा' सल्ला मे महिन्यात आतापर्यंत दररोज सरासरी 4 हजार रुग्णांचा मृत्यू होत आहे. यात जुन्या मृत्यूच्या आकडेवारीचाही समावेश आहे. गेल्या 24 तासात देशात 2 लाख 57 हजार 299 नवीन रुग्ण आढळून आले. त्यात 4 हजार 194 लोकांचा कोरोना व्हायरसनं बळी घेतला. दिलासादायक बाब म्हणजे, एका दिवसात 3 लाख 57 हजार 639 रुग्ण बरे होऊन घरी परतले. भारतातील एकूण आकडा भारतातील रुग्णांची एकूण संख्या 2 कोटी 62 लाख 89 हजर 290 इतकी झाली आहे. या महामारीमध्ये आतापर्यंत 2 लाख 95 हजार 525 लोकांनी आपला जीव गमावला आहे. देशात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 29 लाख 23 हजार 400 आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus, Lockdown

    पुढील बातम्या