रोहित पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, देशाला आज लसीकरणाची सर्वाधिक गरज असून केंद्र सरकारने व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेऊन देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढावे. त्यासाठी बजेटमध्ये केलेली ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद आणि आरबीआयकडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी रुपये या कार्यक्रमासाठी वापरता येतील.देशाला आज लसीकरणाची सर्वाधिक गरज असून केंद्र सरकारने व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेऊन देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढावे. त्यासाठी बजेटमध्ये केलेली ३५ हजार कोटी ₹ ची तरतूद आणि @RBI कडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी ₹ या कार्यक्रमासाठी वापरता येतील.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 22, 2021
तसंच पुढे रोहित पवार यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं, राज्ये स्वतःच्या पायावर उभी राहिली तर देश उभा राहील. त्यासाठी राज्याची लोकसंख्या, तिथं कोरोनाचा झालेला प्रादुर्भाव आणि जीएसटीमध्ये संबंधित राज्याचा वाटा यानुसार राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीचं प्रमाण ठरवावं. असं केलं तर कोरोनावर आपण लवकर नियंत्रण मिळवू शकू! केंद्र सरकारच्या खजिन्यात येणार 99 हजार कोटी शुक्रवारी आरबीआय सेंट्रल बोर्ड(RBI Central Board)ची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत आरबीआयकडून केंद्र सरकारला 99 हजार 122 कोटी रुपये देण्यात येणार आहे. जुलै 2020 पासून ते मार्च 2021 पर्यंतची ही सरप्लस रक्कम केंद्र सरकारकडे जमा करण्यात येणार आहे. एका निवेदनानुसार, आरबीआयनं बोर्डानं कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर प्रार्दुभाव कमी करण्यासाठी सद्य आर्थिक परिस्थिती, जागतिक आणि देशांतर्गत आव्हानं तसंच धोरणात्मक उपायांचा आढावा घेतला. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.राज्ये स्वतःच्या पायावर उभी राहिली तर देश उभा राहील. त्यासाठी राज्याची लोकसंख्या, तिथं कोरोनाचा झालेला प्रादुर्भाव आणि #GST मध्ये संबंधित राज्याचा वाटा यानुसार राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीचं प्रमाण ठरवावं.असं केलं तर कोरोनावर आपण लवकर नियंत्रण मिळवू शकू!@PMOIndia@nsitharaman
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 22, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Central government, Corona vaccination, Coronavirus, NCP, Rohit pawar