मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /COVID-19 Effect: ऑस्ट्रेलिया-US मध्ये भारतातून प्रवासावर BAN! 15 हून अधिक देशांत कठोर निर्बंध

COVID-19 Effect: ऑस्ट्रेलिया-US मध्ये भारतातून प्रवासावर BAN! 15 हून अधिक देशांत कठोर निर्बंध

Corona काळात प्रवास करताना हलगर्जीपणा नको

Corona काळात प्रवास करताना हलगर्जीपणा नको

बर्‍याच देशांनी पुन्हा एकदा भारतातून येणाऱ्या-जाणाऱ्या उड्डाणांवर बंदी जाहीर केली आहे. तर काही देशांनी भारताबाहेर जाणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांनी तर भारतातूनन प्रवास करणाऱ्यांवर कठोर निर्बंध आणले आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 01 मे: मार्च 2020 मध्ये भारताने देशव्यापी लॉकडाऊनमुळे सर्व आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाणे थांबवण्याची घोषणा केली होती, तेव्हापासून आजपर्यंत नियमित कामकाज सुरू झाले नाही. वंदे भारत मिशन अंतर्गत भारताने इतर देशात अडकलेल्या अनेक भारतीयांना मायदेशी परतण्यात मदत केली होती. शिवाय अनेक देशांबरोबर आंतरराष्ट्रीय उड्डांणांसंदर्भात द्वीपक्षीय करार देखील केला होता. भारताने 27 देशांशी एअर बबल करार केला होता, शिवाय इतर काही देशांतही उड्डाणं सुरू होती. मात्र आता बर्‍याच देशांनी पुन्हा एकदा भारतातून येणाऱ्या-जाणाऱ्या उड्डाणांवर बंदी जाहीर केली आहे.  तर काही देशांनी भारताबाहेर जाणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांनी तर भारतातूनन प्रवास करणाऱ्यांवर कठोर निर्बंध आणले आहे.

अमेरिकेची भारतातील हवाई प्रवासावर बंदी

भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona Cases in India) होणारी वाढ पाहाता अमेरिकेनं हवाई प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जो बायडेन प्रशासन पुढील आठवड्यापासून भारतातून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेश बंदी (US Banned Travel from India) करत आहे. व्हाईट हाऊसनं शुक्रवारी सांगितलं, की अमेरिका 4 मेपासून भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालणार आहे. इतकंच नाही तर अशा लोकांनाही अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही, जे मागील 14 दिवसांत भारतात प्रवास करून आले आहेत. देशात कोरोनाचे अनेक प्रकारचे व्हेरियंट पसरत आहेत. याआधीही अमेरिकेनं आपल्या देशातील नागरिकांना भारतात न जाण्याचा आणि लवकरात लवकर देश सोडण्याचा सल्ला दिला होता.

ऑस्ट्रेलियामध्ये होणार तुरुंगवास

भारतामधून ऑस्ट्रेलियातच जाणाऱ्या नागरिकांना जेलमध्ये टाकण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियन सरकारनं (Australia Government) घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील पहिलाच अशा प्रकारचा निर्णय आहे. यानुसार ऑस्ट्रेलियात येण्यापूर्वी 14 दिवस भारतामध्ये वास्तव्य असलेल्या नागरिकांना 5 वर्षांपर्यंतच्या जेलची तरतूद करण्यात आली आहे. भारतामधून ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या नागरिकांना पाच वर्षांची जेल किंवा 66 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंड  अशी तरतूद ऑस्ट्रेलियन सरकारच्या कायद्यामध्ये करण्यात आली आहे. या कायद्याची अंमलबजावणी येत्या 48 तासांमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिली आहे.

इतर देशांनीही भारतातील प्रवासावर आणले निर्बंध

हाँगकाँग, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, युएई, कॅनडा, पाकिस्तान, बांग्लादेश, न्यूझीलंड, इराण, नेदरलँड, थायलँड, इटली, बेल्जियम, फ्रान्स इत्यादी देशांनी भारतात येण्यास/भारतातून या देशांमध्ये जाण्यास बॅन लागू केला. या देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर कठोर निर्बंध आणले आहेत. तर इस्रायल,  सिंगापूर, जर्मनी, मालदीव्स या देशांनी देखील भारतातून प्रवास करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  देशातील कोरोनाची वाढती आकडेवारी लक्षात घेता संबंधित देशांच्या प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

(हे वाचा-भारतातून ऑस्ट्रेलियात जाणार असाल तर खावी लागेल तुरुंगाची हवा, 'हे' आहे कारण)

म्युटेटेड कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या भीतीमुळे हाँगकाँग सरकारने 20 एप्रिलपासून 14 दिवसांसाठी भारतातून येणाजाणाऱ्या पॅसेंजर फ्लाइट्सवर बंदी आणली आहे. मुंबईतून हाँगकाँगमध्ये पोहोचलेले काही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानने देखील दोन आठवड्यासाठी भारतातील प्रवासासाठी बंदी आणली आहे.

ब्रिटिश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी भारतातील दौरा रद्द केल्याच्या दुसऱ्याच दिवशी इंग्लंड सरकारने भारताला 'रेड लिस्ट' मध्ये टाकलं आहे. ब्रिटिश नागरिकांना भारतातून आल्यानंतर 11 दिवस क्वारंटाइन व्हावं लागणार आहे, इतर लोकांना भारतातून इंग्लंडमध्ये येण्याची परवानगीच नाही आहे. एअर इंडियाने देखील भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या-येणाऱ्या फ्लाइट्स 24 ते 30 एप्रिल दरम्यान बंद केल्या होत्या. युनायटेड स्टेट्सच्या Centers for Disease Control and Prevention (CDC) देखील 20 एप्रिल रोजी नोटिफिकेशन जारी करत भारतातून प्रवास टाळण्यास सांगितले आहे.

(हे वाचा-बाहुबलीचा कोरोनामुळे अंत! मोहम्मद शहाबुद्दीनचा मृत्यू, तुरुंगात भोगत होता शिक्षा)

न्यूझीलंडमध्ये देखील भारतीय व्हेरिएंटच्या 17 केसेस आढळून आल्यानंतर प्रशासनाने भारतातील प्रवासावर बंदी आणली आहे. कॅनडाने देखील भारत आणि पाकिस्तानमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी आणली आहे. याठिकाणी कार्गो फ्लाइट्स सुरू राहणार आहेत. सौदी अरेबियाने 20 देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर देशात येण्याची बंदी आणली आहे, त्यात भारताचा समावेश आहे. युएईमध्ये देखील 24 एप्रिलपासून 10 दिवस भारतातून येणाऱ्या फ्लाइट्सवर बंदी आहे.

इटलीने देखील भारतातून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्यात आली आहे. इटलीचे आरोग्यमंत्री Roberto Speranza  यांनी अशी माहिती दिली आहे की गेल्या 14 दिवसात भारतात प्रवास करणाऱ्या परदेशी प्रवाशांना देशात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Corona, Corona hotspot, Corona spread, Corona updates, Coronavirus