मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /भारतातून ऑस्ट्रेलियात जाणार असाल तर खावी लागेल तुरुंगाची हवा, 'हे' आहे कारण

भारतातून ऑस्ट्रेलियात जाणार असाल तर खावी लागेल तुरुंगाची हवा, 'हे' आहे कारण

भारतामधून ऑस्ट्रेलियातच जाणाऱ्या नागरिकांना जेलमध्ये टाकण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियन सरकारनं (Australia Government) घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील पहिलाच अशा प्रकारचा निर्णय आहे.

भारतामधून ऑस्ट्रेलियातच जाणाऱ्या नागरिकांना जेलमध्ये टाकण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियन सरकारनं (Australia Government) घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील पहिलाच अशा प्रकारचा निर्णय आहे.

भारतामधून ऑस्ट्रेलियातच जाणाऱ्या नागरिकांना जेलमध्ये टाकण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियन सरकारनं (Australia Government) घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील पहिलाच अशा प्रकारचा निर्णय आहे.

मुंबई, 1 मे : भारतामधून ऑस्ट्रेलियातच जाणाऱ्या नागरिकांना जेलमध्ये टाकण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियन सरकारनं (Australia Government) घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील पहिलाच अशा प्रकारचा निर्णय आहे. यानुसार ऑस्ट्रेलियात येण्यापूर्वी 14 दिवस भारतामध्ये वास्तव्य असलेल्या नागरिकांना 5 वर्षांपर्यंतच्या जेलची तरतूद करण्यात आली आहे.

भारतामधून ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या नागरिकांना पाच वर्षांची जेल किंवा 66 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंड  अशी तरतूद ऑस्ट्रेलियन सरकारच्या कायद्यामध्ये करण्यात आली आहे. या कायद्याची अंमलबजावणी येत्या 48 तासांमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिली आहे.

भारतामध्ये वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे ऑस्ट्रेलियन सरकारनं हा निर्णय घेतला आहे. सरकारनं याबाबत नवा Biosecurity Act संमत केला आहे. ऑस्ट्रेलियन सरकारनं 15 मे पर्यंत भारतामधून येणाऱ्या विमानांना बंदी घालण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. ही बंदी आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे. सध्या भारतामध्ये सुमारे 9 हजार ऑस्ट्रेलिन नागरिक आहेत. यापैकी जवळपास 600 जणांना कोरोनाचा धोका असल्याचं वृत्त आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंचं काय होणार?

ऑस्ट्रेलियानं भारतामधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. त्यामुळे आयपीएलसाठी (IPL 2021) भारतामध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना परत कसं जायचं हा प्रश्न पडला आहे. तीन ऑस्ट्रेलियन खेळाडू यापूर्वीच स्पर्धेतून माघार घेऊन परत गेले आहेत. तर स्पर्धा संपल्यावर सर्वांसाठी विशेष चार्टर प्लेनची व्यवस्था करण्याची मागणी ख्रिस लीन (Chis Lynn) यानं केलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेल यांनं याबाबतचा प्रस्ताव दिला आहे. आयपीएल संपल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड या देशांचे खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी इंग्लंडला जाणार आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन खेळाडू देखील त्यांच्यासोबत इंग्लंडला जाऊ शकतात. इंग्लंडमध्ये काही दिवस राहून ते ऑस्ट्रेलियात जातील, असं मॅक्सवेलनं सूचवलं आहे. एका खासगी पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये मॅक्सवेलनं हा प्रस्ताव मांडला आहे.  सध्या 17 ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळत आहेत.

आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर प्रत्येक खेळाडूला त्याच्या मायदेशी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी बीसीसीआयनं घेतली असून, त्यासाठी सर्व व्यवस्था करण्याबाबत संबधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे, असं बीसीसीआयचे सीओओ हेमांग अमिन(Hemang Amin)यांनी सांगितले आहे.

First published:
top videos

    Tags: Australia, Coronavirus, India