नलँड, 24 सप्टेंबर : जगातील सर्वच प्रमुख देशांमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. विविध देश आपापल्या पद्धतीने या आजाराचा सामना करत आहेत. सुरुवातीला लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या निर्णयानंतर आता हळूहळू सर्व गोष्टी पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक देश वैद्यकीय चाचणी करूनच कोरोना रुग्ण शोधत आहेत. मात्र फिनलँडने नवीन क्लूप्ती शोधली असून, त्यांनी यासाठी ते श्वानांची मदत घेत आहेत. होय हे खरे आहे, फिनलँडमधील नॉर्डियाक कंट्रीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे श्वान वास घेऊन समोरची व्यक्ती कोरोनाबाधित आहे की नाही याचा तपास करू शकणार आहेत. हेलसिंकी विमानतळावर विविध जातींचे चार श्वान तैनात केले असून, त्यांना Finlands Smell Detection Association ने ट्रेनिंग दिलं आहे. कुत्र्यांच्या मदतीनं कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा शोध घेणारा फिनलँड हा UAE नंतरचा दुसरा देश ठरला आहे. (हे वाचा- निगेटिव्ह आल्यानंतरही भारतीयांना दुसऱ्यांदा होतोय कोरोना, यावेळी प्रकृती गंभीर ) फिनलँडच्या या प्रयोगाकडे स्वस्त आणि सर्वांत विश्वासू पर्याय म्हणून या पाहिलं जात आहे. विमानतळावर प्रवासी उतरल्यानंतर तात्काळ त्यांना या कुत्र्यांच्या मदतीनं तपासलं जाणार आहे. मात्र जर प्रवासी स्वतः टेस्ट करण्यासाठी तयार असेल तर मात्र या श्वानांच्या मदतीनं त्याची चाचणी केली जाणार नाही. यासाठी खर्चदेखील असून व्हेंटा या शहराचे उपमहापौर टिमो आरोनकीटो यांनी याविषयी माहिती देताना सांगितलं, ’ या पद्धतीसाठी जवळपास 3 लाख युरो खर्च येणार असून, इतर टेस्टिंगच्या तुलनेत हा खर्च खूप कमी आहे. त्यामुळं आम्ही या पर्यायाचा विचार केला.’ अशा पद्धतीने होते तपासणी प्रवासी विमानतळावर उतरल्यानंतर त्यांच्या त्वचेच्या वरच्या थराचा नमुना घेतला जातो. त्यानंतर एका बरणीत भरून हा नमुना या श्वानांकडे दिला जातो. त्यानंतर 10 सेकंद वास घेतल्यानंतर हे श्वान त्यांच्या काही ठराविक कृत्यांनी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही हे सांगतात. पायाचा पंजा घासून अथवा भुंकून किंवा लोळून ते आपला निष्कर्ष सांगतात. या सर्व कामासाठी एका मिनिटापेक्षा कमी वेळ लागत असून प्रवाशांनादेखील ताटकळंत उभं रहावं लागत नाही. (हे वाचा- धक्कादायक! देशात कोरोनामुळे आतापर्यंत 91 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू ) जर या टेस्टमध्ये व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली तर त्याला कोरोनाची टेस्ट करायला सांगितलं जातं. यामुळं नक्की हे श्वान बरोबर आहेत की नाही हेदेखील तपासलं जातं. ET, Kossi, Miina आणि Valo अशी या श्वानांची नावं आहेत. त्यामुळं फिनलँडमधील हा प्रयोग किती यशस्वी होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







