Home /News /coronavirus-latest-news /

सावधान! कॅनडा, ब्रिटनमध्ये आली Coronavirus ची दुसरी लाट; मुंबईत काय आहे परिस्थिती?

सावधान! कॅनडा, ब्रिटनमध्ये आली Coronavirus ची दुसरी लाट; मुंबईत काय आहे परिस्थिती?

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचं म्हटलं आहे. मुंबई आणि दिल्लीतही पुन्हा Covid-19 रुग्णवाढू लागल्याने ही दुसरी लाट आहे का असा प्रश्न विचारला जात आहे.

    नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचं (Coronavirus) संकट पसरलेलं आहे. सुरुवातीला युरोपात आणि अमेरिकेत वेगाने रुग्ण वाढत होते. आता तिथे कोरोनाचा आलेख सपाट झाला म्हणजे बेसुमार वाढ थांबली. मात्र सध्या ब्रिटन आणि कॅनडामध्ये  मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचं म्हटलं आहे.  मुंबई आणि दिल्लीतही सुरुवातीला वाढलेली Covid-19 रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आणि पुन्हा वाढू लागल्याने ही दुसरी लाट आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. भारतात आतापर्यंत जवळपास 92 हजारांवर Covid रुग्णांचा मृत्यू झाला असून दररोज हजारो नव्या रुग्णांची भर देखील पडत आहे.  Corona रुग्णांच्या एकूण संख्येत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. 58 लाखांवर कोरोनारुग्ण देशात सापडले आहेत. जगभरात सर्वांत जास्त रुग्ण हे अमेरिकेत सापडले असून ती संख्या 71 लाखांच्या वर आहे. जगभर एकूण रुग्णांची संख्या 3 कोटी 4 लाख 7 हजार इतकी झाली आहे. यामध्ये जवळपास 10 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण अमेरिकेसह युरोपमध्ये रुग्णवाढीचा वेग मंदावल्यामुळे थोडा दिलासा मिळत होता, असं असतानाच पुन्हा रुग्णवाढीची बातमी आली आहे. सध्या ब्रिटन आणि कॅनडामध्ये  मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 4,16,363 रुग्ण आढळून आले आहेत.  इतर देशांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. रुग्णांच्या तुलनेत देशात मृतांची संख्या जास्त असून ब्रिटनमध्ये आतापर्यंत 41,902 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर कॅनडामध्ये देखील रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. ब्रिटनच्या तुलनेत कॅनडामध्ये अतिशय कमी रुग्ण असून, केवळ 1,49,094 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. यामध्ये 9,249 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देखील देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचं म्हटलं आहे. मुंबईतसुद्धा असाच ट्रेंड दिसला. गणेशोत्सवानंतर रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पण मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दुसरी लाट असल्याचं अमान्य केलं आहे. गुरुवारी मुंबईत 2156 नव्या करोना रुग्णांची तर 54 कोरोनारुग्णांचा मृत्यू नोंदला गेला. पण कोरोना चाचण्यांची संख्या महापालिकेने वाढवली आहे आणि याला दुसरी लाट म्हणता येणार नाही, असं मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, जगभरात विविध देशांच्या लसीची चाचणी सुरू आहे. मात्र जोपर्यंत लस  बाजारात येत नाही तोपर्यंत सगळ्यांनाच काळजी घेण्याची गरज आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नागरिकांना लशीच्या चाचणीमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केलं आहे. जगभरातील इतर देशांच्या रुग्णसंख्येवर नजर टाकताना दिसून येत की, अमेरिकेत गुरुवारी 45,355 रुग्ण सापडले असून 942 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता अमेरिकेत एकूण रुग्णसंख्या 71 लाख 85 हजार 471 झाली आहे. ब्राझीलमध्ये गुरुवारी 32,129 रुग्ण सापडले असून 818 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ब्राझीलमध्येदेखील कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचबरोबर इस्रायलमध्येदेखील आतापर्यंत 2,12,115 रुग्ण सापडले असून , आतापर्यंत 1378 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नुकताच इस्रायलमध्ये लॉकडाउन देखील करण्यात आला होता. त्याचबरोबर कडक निर्बंध देखील लादण्यात आले आहेत.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या