Home /News /national /

संरक्षण सचिवांनाच झाला कोरोनाचा संसर्ग, 30 अधिकाऱ्यांना केलं क्वारंटाइन

संरक्षण सचिवांनाच झाला कोरोनाचा संसर्ग, 30 अधिकाऱ्यांना केलं क्वारंटाइन

सरीन आणि त्यांच्या पथकाने दिल्लीत अभ्यास करून हे निष्कर्ष काढले आहेत.

सरीन आणि त्यांच्या पथकाने दिल्लीत अभ्यास करून हे निष्कर्ष काढले आहेत.

संरक्षण सचिवांच्या संपर्कात असलेल्या लोकांना शोधण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक प्रचंड मोहीम राबविली आहे. बुधवारी कुमार यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली होती.

    नवी दिल्ली, 04 जून : भारतात कोरोनाची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. डॉक्टर, पोलीस यांच्यानंतर आता लष्करातील अधिकाऱ्यांनाही कोरोनाचा धोका आहे. आता संरक्षण सचिव अजय कुमार COVID-19 पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. यानंतर त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांना शोधण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक प्रचंड मोहीम राबविली आहे. बुधवारी कुमार यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली होती. अजय कुमार यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतल रायसीना हिल्सच्या साऊथ ब्लॉकमधील मंत्रालयाच्या मुख्यालयात काम करणाऱ्या 35 अधिकाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. कुमार यांच्या दक्षिण-ब्लाकच्या कॉरिडोअरमध्ये टेस्ट पॉझिटिव्ह येत असल्याच्या वृत्तानंतर संरक्षण मंत्रालयाचे बरेच अधिकारी त्यांच्या कार्यालयात हजर नव्हते. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेदेखील या कार्यालयात हजर नव्हते, अशीही माहिती मिळाली आहे. तरीही अजित कुमार यांच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांचा शोध सुरू आहे. वाचा-पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, 'ही' आहे नव्या 28 मायक्रो कंटेनमेंट झोनची यादी साऊथ ब्लॉकच्या पहिल्या मजल्यावर संरक्षणमंत्री, संरक्षण सचिव, सेना प्रमुख आणि नेव्ही चीफ यांची कार्यालये आहेत. कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर संपूर्ण साऊथ ब्लॉक सॅनिटाइज करण्यात आला आहे. याआधी राज्यसभा आणि लोकसभा सचिवालयातील तीन अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळले होते. त्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचार्‍यांना क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. वाचा-24 तासांत तब्बल 9304 नवीन रुग्णांची नोंद, 'हे' 17 जिल्हे सर्वात धोकादायक मुख्य म्हणजे अजित कुमार1 जूनपर्यंत सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय होते. एवढेच नाही तर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारच्या योजनांबद्दल जनतेला सांगत होते.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या