Home /News /mumbai /

Lockdown निर्बंध शिथिल; आता मुंबईतून ठाणे, कल्याण, बदलापूरला जायला निर्बंध नाहीत

Lockdown निर्बंध शिथिल; आता मुंबईतून ठाणे, कल्याण, बदलापूरला जायला निर्बंध नाहीत

नव्या नियमावलीत मुंबई महानगरीय क्षेत्रात (MMR) प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

    मुंबई, 04 जून : महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या नियमावलीत बदल करण्यात आले. आता बदललेली नियमावली सरकारने जारी केली आहे. या नव्या नियमावलीत मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमध्ये (MMR) प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, बदलापूर या मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमधील महापालिका क्षेत्रातील नागरिकांना जिल्ह्याअंतर्गत प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने पाचव्या लाॅकडाऊनमध्ये जिल्ह्याअंतर्गत वाहतूक बंदी केली होती. यामुळे मुंबई महानगरीय क्षेत्रातही कामानिमित्त प्रवास करणं शक्य नव्हतं. यामुळे राज्य सरकारने कायद्यात बदल केला आहे आणि एमएमआरडीए क्षेत्रात वाहतूक परवानगी दिली आहे. याशिवाय आऊटडोर फिजिकल अॅक्टिव्हिटी म्हणजे घराबाहेर व्यायाम करायला गेलात तर तुम्हाला ओपन जिममधील कोणतीही उपकरणं वापरता येणार नाहीत. रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने एकाचदिवशी उघडण्यास परवानगी नाही. ऑड आणि इव्हन या नियमाप्रमाणे रस्त्याच्या एका बाजूची आणि दुसऱ्या बाजूची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. खासगी ऑफिसमध्ये 10 टक्के कर्मचारी असतील. इतर कर्मचारी घरून काम करतील. ऑफिसमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना द्याव्यात. हे वाचा - नोकरी जाण्याचं टेन्शन आता विसरा, लॉकडाऊनमध्ये हे काम करून लाखो कमवा घरोघरी वृत्तपत्र वितरण करता येणार आहे, मात्र वृत्तपत्र दारोदारी पोहोचवणाऱ्याने मास्क घालणं बंधनकारक आहे, सोशल डिस्टन्सिंग नियमांचंही पालन करावं. महाराष्ट्रात 24 तासांत 122 रुग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात बुधवारी 122 रुग्णांचा मृत्यू झाला होता. एका दिवसात सर्वात जास्त मृतांची ही नोंद आहे. यासह महाराष्ट्रातील मृतांचा आकडा आता 2587 झाला आहे. तर, गेल्या 24 तासांत 2560 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह महाराष्ट्रातील आकडा आता 74 हजार 860 झाला आहे. आतापर्यंत 32 हजार 329 रुग्ण निरोगीही झाले आहेत. देशातील रुग्णांचाही वाढता आकडा देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळी दहापर्यंत भारतात तब्बल 9304 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतचा हा सर्वात जास्त आकडा आहे. याआधी एवढ्या मोठ्या संख्येने नवीन रुग्णांनी नोंद झाली नव्हती. भारतात आता एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 2 लाख 16 हजार 919 झाला आहे. सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारता आता सातव्या क्रमांकावर आहे. भारतात सध्या 1 लाख 06 हजार 737 सक्रिय रुग्ण असून 1 लाखांहून अधिक रुग्ण निरोगीही झाले आहे. तर 6075 जणांचा मृत्यू झाला आहे. हे वाचा - कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये आली चांगली बातमी; जीवनावश्यक वस्तू झाल्या स्वस्त भारतात कोरोनोबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी एक दिलासादायक बातमी म्हणजे रिकव्हरी रेट. भारतात एक लाखांहून अधिक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत, याचा अर्थ भारताचा रिकव्हरी रेट हा 48% आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Lockdown, Maharashtra

    पुढील बातम्या