Corona फोफावतोय! भारताला या विळख्यातून बाहेर काढू शकतील फील्ड हॉस्पिटल्स, वाचा सविस्तर

Corona फोफावतोय! भारताला या विळख्यातून बाहेर काढू शकतील फील्ड हॉस्पिटल्स, वाचा सविस्तर

कोरोनाच्या विळख्यातून (Coronavirus Pandemic) बाहेर पडण्यासाठी तज्ज्ञ विविध उपाययोजनांचा विचार करत आहेत. फील्ड हॉस्पिटल (Field Hospital) यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 एप्रिल: देशभरात सध्या कोरोनाच्या (Coronavirus Second Wave) दुसऱ्या लाटेचा प्रकोप पाहायला मिळतो आहे. रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता आहे, ऑक्सिजनचा तुटवडा आहे. देशभरात एखादंच असं राज्य असेल ज्याठिकाणाहून अशाप्रकारच्या गोंधळाची बातमी समोर आली नाही आहे. घाबरलेली जनता कोरोनापासून (COVID-19) वाचण्यासाठी प्रयत्न करत आहे तर तज्ज्ञ या महामारीला कसं थांबवायचं यासाठी प्रयत्न करत आहेत. यावेळी परंपरागत उपायांव्यतिरिक्तही काही सूचना पुढे येत आहेत. तज्ज्ञांच्या मते, फील्ड हॉस्पिटल (Field Hospital) यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात.

कोरोना रूग्णांच्या वाढीमुळे आधीच गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशी अनेक रुग्णालये आहेत जिथे सामान्य रूग्णांव्यतिरिक्त स्वतंत्र कोरोना वॉर्ड तयार करूनही उपचार केले जातात. अशा परिस्थितीत सामान्य गंभीर रुग्णांवर दुप्पट धोका असतो. एक म्हणजे कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे त्यांना नीट उपचार मिळत नाहीत, तर दुसरीकडे अशा रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने त्यांना कोरोना संसर्ग झाल्यास ते अधिक धोकादायक ठरू शकते.

UAE सह अनेक मिडल इस्ट देशांनी बनवले फील्ड हॉस्पिटल्स

इंडियन एक्स्प्रेसमधी लेखात दोन तज्ज्ञांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, कोरोना रोखण्यासाठी भारताने यावेळी फील्ड रुग्णालयांचा पर्याय निवडायला हवा. अशी रुग्णालये लवकर तयार केली जाऊ शकतात आणि इतर गंभीर रुग्णांच्या अडचणीही कमी होतील. युएईसह मध्य पूर्वेकडील बर्‍याच देशांनी अशी फील्ड रुग्णालये बांधून कोरोनाविरूद्ध यशस्वी लढाईचे एक उदाहरण ठेवले आहे.

भारतामध्ये फील्ड हॉस्पिटल्सची संख्या कमी

भारतामध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये अशाप्रकारे अस्थायी रुग्णालयांची निर्मिती करण्यात आली होती. दरम्यान तुलनेत मिडल इस्टमध्ये असणाऱ्या अशाप्रकारच्या रुग्णालयांमध्ये सोयीसुविधा अधिक आहेत. अशाप्रकारची सुनियोजित रुग्णालयंत शहरांबाहेर काही दिवसांमध्ये तयार केली जाऊ शकतात. यामुळे सामान्य रुग्णालयांवरील ताण कमी केला जाऊ शकतो.

(हे वाचा-सावधान! कोरोनापासून बचाव करताना तुम्ही गंभीर आजाराला निमंत्रण तर देत नाहीयेत ना?)

अशाप्रकारची बेस्ट रुग्णालयं युएईमध्ये उभारण्यात आली आहेत. खलीज टाइम्सच्या एका अहवालानुसार दुबई हेल्थ अथॉरिटीचे डायरेक्टर जनरल हुमैद अल कुतामी यांनी एका टीव्ही मुलाखतीमध्ये असे म्हटले होते की दुबईमध्ये दोन फील्ड रुग्णालयं उभारण्यात आली आहेत. अल कुतामी यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रत्येक रुग्णालयांमध्ये चार ते पाच हजार बेड्सची व्यवस्था आहे. याशिवाय दुबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरला देखील कोरोना व्हायरस संक्रमण कमी करण्यासाठी 3 हजार बेडच्या रुग्णालयात बदलण्यात आले होते.

भारतात प्रयत्न सुरू

दरम्यान, भारतातही कोरोनावरील उपचारांसाठी दिल्लीत डीआरडीओतर्फे नवीन कोविड सुविधा उपलब्ध केली जात आहे. ही सुविधा तयार झाल्यानंतर दिल्लीत कोव्हिडच्या उपचारासाठी अतिरिक्त 500 बेड उपलब्ध होतील. याव्यतिरिक्त, संरक्षणमंत्र्यांनी डीआरडीओला लखनऊमध्ये देखील तात्पुरती दोन तात्पुरती रुग्णालये तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

(हे वाचा-Corona vaccination : कोरोना होऊन गेला असेल तर लशीचा एक डोस पुरेसा नाही का?)

पाचशे बेड्सच्या रुग्णालयांमध्ये डीआरडीओचे डॉक्टर आणि कर्मचारी यांच्याव्यतिरिक्त सशस्त्र सेना आणि केंद्रीय पोलीस दलातील डॉक्टर तैनात असतील. आवश्यक असल्यास, बेडची संख्या  वाढवली जाऊ शकते. गेल्या वर्षीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, जुलै 2020 मध्ये सैन्य आणि निमलष्करी दलांचे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह 1000 बेडचे असे रुग्णालय बांधले गेले. यापैकी 500 बेड्स आयसीयू सुविधेसह सुसज्ज होते.

इंडियन एक्स्प्रेसच्या लेखानुसार, भारतातील कोरोनाची दुसरी लाट इतकी तीव्र आहे की अशा प्रकारच्या अधिक रुग्णालयांची आवश्यकता आहे. सामान्य रुग्णालयांवरील ताण केवळ फील्ड हॉस्पिटल्सच्या माध्यमातून कमी करता येईल आणि मोठ्या संख्येने लोकांचे प्राणही वाचू शकतात.

Published by: Janhavi Bhatkar
First published: April 20, 2021, 7:41 AM IST

ताज्या बातम्या