मुंबई, 19 एप्रिल : आपल्याला कोरोना (Coronavirus) होऊ नये, यासाठी प्रत्येक जण आजही प्रयत्न करतो आहे. कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave), त्यात कोरोनाचं बदलतं रूप याचा धसका अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) मजबूत ठेवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. वेगवेगळी औषधं घेतली जात आहेत. पण कोरोनापासून बचाव करता करता अशी औषधं जास्त प्रमाणात घेतल्यानं दुसऱ्या गंभीर आजाराला तुम्ही निमंत्रण देत आहात. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोक जास्तीत जास्त औषधं घेत आहेत आणि यामुळे यकृतासंबंधी गंभीर आजार बळावू शकतो, असं भारतातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं आहे. ILBS चे संचालक डॉ. एस. के. सरिन यांनी याबाबत लोकांना सावध केलं आहे.
People are consuming many medicines assuming them to be immunity-boosters. Some might be good but those with no scientific evidence, Ayurvedic, Homeopathic or anything else, could harm liver. In attempt to avoid COVID, you could develop liver-related issues: ILBS Director #Delhi pic.twitter.com/qmBcAzBUdB
— ANI (@ANI) April 19, 2021
एएनआयशी बोलताना डॉ. सरिन यांनी सांगितलं, “लोक इम्युनिटी बुस्टर म्हणून अनेक औषधं घेत आहेत. त्यापैकी काही औषधं चांगली आहेत . पण वैज्ञानिक पुरावा नसलेली किंवा काही आयुर्वेदिक, होमिओपॅथिक किंवा इतर औषधं यकृताला हानी पोहोचवू शकता. कोरोनापासून बचाव करता करता तुम्हाला यकृतासंबंधी समस्या बळावू शकतात” हे वाचा - BREAKING! आता 18+ व्यक्तींना मिळणार CORONA VACCINE! PM मोदींचा मोठा निर्णय दरम्यान कोरोनाविरोधात लढ्याला एक वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या वर्षभरात वेगवेगळ्या औषधांनी कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहे. या उपचारात दोन महत्त्वाच्या गोष्टी समजल्या, असं एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं.
गेली एक वर्षे कोरोनाशी दोन हात करताना औषध आणि औषधांची वेळ या दोन गोष्टी प्रामुख्याने समजल्या. जर औषध अगदी लवकर किंवा उशिरा दिलं गेलं तर त्याचा दुष्परिणाम होतो आणि एकाच दिवसात भरपूर औषधं दिली तर अधिक हानीकारक ठरून कोरोना रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. हे वाचा - Remdesivir स्वस्त झालं पण…; औषधाबाबत AIIMS ने दिली मोठी माहिती तसंच कोरोना रुग्णांवर रेमडेसिवीर आणि प्लाझ्मा थेरेपीचाही फार फायदा होत नाही. डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं.