मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

देशाची चिंता वाढवणाऱ्या Mucormycosis आजारातून कसं बरं होणार? जाणून घ्या उपाय

देशाची चिंता वाढवणाऱ्या Mucormycosis आजारातून कसं बरं होणार? जाणून घ्या उपाय

म्युकॉर्मायकॉसिस नावाच्या एका बुरशीजन्य संसर्गाने भीती पसरवली आहे.

म्युकॉर्मायकॉसिस नावाच्या एका बुरशीजन्य संसर्गाने भीती पसरवली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सगळीकडे कहर केलेला असताना म्युकॉर्मायकॉसिस (Mucormycosis) नावाच्या एका बुरशीजन्य संसर्गाने (Fungal Infection) भीती पसरवली आहे.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 13 मे:  देशात कोरोना रुग्णांची संख्या थोड्याफार प्रमाणात घटत असताना आता पुन्हा एकदा नवीन संर्गामुळे चिंता वाढलेली आहे. कोराना संसर्गातून बाहेर पडलेल्यांमध्ये म्युकॉर्मायकॉसिस (Mucormycosis) नावाचा संसर्ग वाढत असल्याने चिंतेच वातावरण आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सगळीकडे कहर केलेला असताना म्युकॉर्मायकॉसिस (Mucormycosis) नावाच्या एका बुरशीजन्य संसर्गाने (Fungal Infection) भीती पसरवली आहे. कोविड-19 मधून (Covid 19) बऱ्या होत असलेल्या काही रुग्णांना काळ्या बुरशीमुळे (Black Fungus) संसर्ग होत आहे.

(बँकेचा हा मेसेज Ignore करू नका; नाहीतर बसेल 1 हजारचा फटका)

महाराष्ट्रासह, दिल्ली, गुजरात यासारख्या  अनेक राज्यांत म्युकॉर्मायकॉसिस (Mucormycosis) आढळून आला आहे. या रोगामुळे त्वचा, फुप्फुसं आणि मेंदूमध्ये संसर्ग होत असल्याचं निष्पन्न झालं आहे..मुंबई या आजाराचे एकशे अकरा रुग्ण आढळल्या (111 Mucormycosis patients in Mumbai) ची माहिती पुढे आलेली आहे.

त्यामुळे नेमके या आजारीची लक्षणं काय आहेत ? आणि उपाय काय आहेत? हे जाणून घेऊयात

(पहिली कोरोना लस मिळतानाच मुश्किल; तज्ज्ञ म्हणतायेत तिसरा डोसही घ्यावा लागेल)

म्युकॉर्मायकॉसिस म्हणजे काय?

या विकाराला झायगोमायकॉसिस (Zygomycosis) म्हणूनही ओळखलं जातं. सेंटर फॉर डिसिजेस कंट्रोल अँड प्रिव्हेंशन अर्थात सीडीसीच्या (CDC) म्हणण्यानुसार हा बुरशीजन्य संसर्ग दुर्मिळ आहे. म्युकॉर्मायसिट्स (Mucormycetes) नावाच्या बुरशीमुळे हा संसर्ग होतो. ही बुरशी पर्यावरणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असते. मात्र जेव्हा मानवी शरीराची प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असते, तेव्हाच तिचा संसर्ग शरीरात होतो. या बुरशीचे कण श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर फुप्फुसं, तसंच सायनस यांच्यावर त्याचा दुष्परिणाम होतो. कोविड-19 मुळे त्याची लागण होत असल्याची गोष्ट नवी आणि धोकादायक आहे, असं डॉक्टर्सचं म्हणणं आहे.

(Gmail किती वेबसाईटवर लिंक आहे, असं तपासा; Delink करण्यासाठी पाहा सोपी प्रोसेस)

काय आहेत लक्षणं?

या आजारात ताप येणं, खोकला, डोकेदुखी, दातदुखी, डोळे लाल होणे, डोळे आणि नाका जवळच्या भागात सूज येणे. अशी लक्षणं दिसतात. जास्त इन्फेक्शन असेल तर, श्वासोच्छवाला त्रास होतो. काही पेशंटला रक्ताची उलटीही होते. अशी लक्षण असल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.

(Maharashtra Lockdown: राज्यात लॉकडाऊन वाढवणार; मुख्यमंत्री जाहीर करणार निर्णय)

काय करावं?

म्युकॉर्मायकॉसिस (Mucormycosis)चा संसर्ग झालेल्यांनी आपली ब्लड शुगर लेव्ह तपासावी. कोरोना काळात स्टेरॉईड दिलं जात असेल तर, डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचा डोस बंद करावा. ऍन्टी फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी ट्रीटमेन्ट सुरु करावी. तातडीने बायोप्सी (Biopsy) करून अँटीफंगल ट्रीटमेंट (Antifungal Treatment) अर्थात बुरशीला प्रतिकार करणारी उपचारपद्धती अवलंबणं आवश्यक आहे, घरी असल्यावरही मास्क लावावा. कोणत्याही प्रकारे मातीशी किंवा धुळीशी संपर्क येणार नाही याची खबरदारी पाळावी. इम्युनिटी वाढवाणारा आहार घ्यावा. स्वच्छता पाळावी.

First published:

Tags: Coronavirus, Health Tips