पहिला डोस मिळताना मुश्किल आणि भारतीय तज्ज्ञ म्हणतायेत कोरोना लशीचा तिसरा डोसही घ्यावा लागेल

पहिला डोस मिळताना मुश्किल आणि भारतीय तज्ज्ञ म्हणतायेत कोरोना लशीचा तिसरा डोसही घ्यावा लागेल

सध्या कोरोना लशीचे (Corona vaccine) दोन डोस घेणं बंधनकारक आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 मे : एकिकडे देशात कोरोना लसीकरण मोहिमेला (Corona vaccination) वेग दिला जातो आहे. 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचं लसीकरणही सुरू (Covid 19 vaccination) करण्यात आलं आहे. लस घेण्यासाठी पात्र असलेल्यांचं प्रमाण वाढलं आहे पण कोरोना लशींचा (Corona vaccine) तुटवडा जाणवतो आहे. अनेकांनी कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करून ठेवली आहे पण त्यांना लसीकरणाची वेळ मिळत नाही आहे. कोरोना लशीचे दोन (Covid 19 vaccine) डोस अनिवार्य आहेत. त्यात पहिला डोसही (Corona vaccine dose) मिळणं अशक्य झालं आहे आणि आता तर काय कदाचित तिसऱ्या डोसचीही (Corona vaccine third dose) गरज भासू शकते, असं भारतातील तज्ज्ञांनी म्हटलं आहे

कोव्हिड 19 (Covid-19) पासून सुरक्षा मिळण्यासाठी कदाचित कोरोना लशीचा तिसरा डोस घ्यावा लागू शकतो, असं दिल्लीतील एम्सचे (AIIMS)  संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr Randeep Guleria)  यांनी सांगितलं. CNN-News18 ला दिलेल्या मुलाखतीत ते असं म्हणाले आहेत.

हे वाचा - कोरोना लस घ्यायला जाणाऱ्या मुंबईकरांनो लक्ष द्या! लसीकरण मोहिमेत BMC ने केला बदल

डॉ. गुलेरिया म्हणाले, "कोरोना लशीचा तिसरा डोस घ्यायचा की नाही हे दोन बाबींवर अवलंबून आहे. एक म्हणजे कोरोना लशीचे दोन डोस घेतल्यानंतर मिळणारी रोगप्रतिकारक शक्ती किती काळ टिकते आणि दुसरं म्हणजे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे कोरोना लशीचा प्रभाव झाला तर. पुढील काही महिने आपल्याला हे पाहावं लागेल"

"कोरोना लशीच्या तिसरा डोसबाबत अद्याप काही पुरेसा डेटा नाही. पण मला वाटतं, की एका विशिष्ट कालावधीनंतर आपल्याला याची गरज पडेल. आता लगेच नाही पण नंतर तिसरा डोस घ्यावा लागेल", असं ते म्हणाले.

हे वाचा - Maharashtra Corona updates: आज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा अधिक

"लशींच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे. 45 पेक्षा जास्त वयाच्या ज्या व्यक्तींना पहिला डोस मिळालेला आहे, त्यांना दुसरा डोस देण्यास प्राधान्य दिलं जाईल. या लोकांना केंद्र सरकार दुसरा डोस देऊ शकत नाही. त्यामुळे खरेदी केलेली लस या लोकांना दिली जाणार आहे. जेव्हा सीरममार्फत लस उपलब्ध होईल, तेव्हा ती 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना दिली जाईल", असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

Published by: Priya Lad
First published: May 12, 2021, 7:17 PM IST

ताज्या बातम्या