मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन कोरोना पॉझिटिव्ह, उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन कोरोना पॉझिटिव्ह, उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल

अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र सदाशिव निकाळजे म्हणजेच छोटा राजन याला कोरोनाची लागण (Chota RajanTests positive for Covid-19) झाली आहे. यानंतर त्याला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे

  • Published by:  Kiran Pharate
मुंबई 27 एप्रिल : अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र सदाशिव निकाळजे म्हणजेच छोटा राजन याला कोरोनाची लागण (Chota RajanTests positive for Covid-19) झाली आहे. यानंतर त्याला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याबद्दलची माहिती सोमवारी तिहार जेलच्या अधिकाऱ्यांनी एका सत्र न्यायालयाला दिली. छोटा राजनला 2015 मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून अटक झाल्यानंतर दिल्लीच्या तिहार तुरूंगात ठेवण्यात आलं आहे. त्याच्याविरुध्द मुंबईत नोंदविण्यात आलेली सर्व प्रकरणे सीबीआयकडे (CBI) वर्ग करण्यात आली आहेत. तसंच त्याच्यावर खटला चालविण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. हेही वाचा - सरण संपले पण मरण कधी संपणार ? दापोली नगरपंचायतीने घेतला हा निर्णय तिहारच्या सहाय्यक जेलरने सोमवारी फोनद्वारे सत्र न्यायालयाला सांगितले की, एका खटल्याच्या सुनावणीसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राजन याला न्यायाधीशांसमोर हजर करता येणार नाही. कारण, गुंड राजन कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आला असून उपचारासाठी त्याला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हेही वाचा - भारतात अचानक Oxygen चा तुटवडा का निर्माण झाला? मोदी सरकारचा आता काय आहे प्लॅन? 2015 पासून तिहार जेलमध्ये बंद आहे राजन - छोटा राजन विविध गुन्ह्यांच्या प्रकरणी दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. ऑक्टोबर 2015 मध्ये इंडोनेशियातून प्रत्यार्पण केल्यापासूनच तो तुरुंगात आहे. राजन महाराष्ट्रातील तब्बल 70 प्रकरणांमध्ये आरोपी आहे. यात 2011 मध्ये झालेली पत्रकार जे डे यांच्या हत्येचं प्रकरणही सामील आहे. देशातील कोरोना स्थिती - मागील आठवड्यापासून देशात दररोज तीन लाखाहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे, अशात रविवारीदेखील साडेतीन लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, सोमवारी रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट आली आहे. देशात सोमवारी कोरोनाचे 3 लाख 20 हजार 435 नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर, यादरम्यान 2764 जणांचा मृत्यू झाला आहे.
First published:

Tags: Coronavirus, Gangster, Tihar jail

पुढील बातम्या