सरण संपले पण मरण कधी संपणार ? दापोली नगरपंचायतीने घेतला हा निर्णय
सरण संपले पण मरण कधी संपणार ? दापोली नगरपंचायतीने घेतला हा निर्णय
राज्यामध्ये कोरोनाने थैमान घातले असून मृत्यूने हाहाकार माजवला आहे. अनेक निष्पाप लोकांचे बळी या कोरोनाने घेतले आहेत. तर दुसरीकडे रोज रोज सरण रचून सरण रचनाऱ्यांच मन हेलावून गेलं आहे.
दापोली, 26 एप्रिल : सरण संपले पण काही केल्या मरण मात्र संपण्याचं नाव घेत नाही. मृत्यूचे तांडव सुरूच आहे. कोरोना काळात मृत कुटुंबीयांना थोडा दिलासा देण्यासाठी दापोली नगर पंचायतीने अंत्य संस्काराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली असून विनामूल्य अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय दापोली नगरपंचायतने घेतला आहे. राज्यामध्ये कोरोनाने थैमान घातले असून मृत्यूने हाहाकार माजवला आहे. अनेक निष्पाप लोकांचे बळी या कोरोनाने घेतले आहेत. तर दुसरीकडे रोज रोज सरण रचून सरण रचना-यांचे मन हेलावून गेले आहे.
सरणावर सरणं जळून झाली. परंतु काही केल्या मरण मात्र थांबत नाही. मृत्यूचे सत्र सुरूच आहे. मन सुन्न करणारी ही परिस्थिती सर्वत्र पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती कधी बदलेल व कोरोना कधी जाईल याकडे सर्वजण डोळे लावून बसले आहेत.
दापोली शहरातील ही परिस्थिती अतिशय गंभीर असून दिवसागणिक चार ते पाच लोकांचा मृत्यू होत असल्याने अंत्यसंस्कार करणाऱ्या नगरपंचायत कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ होत आहे. सरण म्हटले की त्यांचे तोंड निशब्द होत असून केवळ त्यांचे हात-पाय स्मशानातील कामाला जुंपून घेतात. सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री आठ वाजेपर्यंत केवळ आणि केवळ मृतावर अंत्यसंस्कार करणे ही एकच जबाबदारी दहा सफाई कामगार वर येऊन ठेपली आहे. कधी नव्हे ते या कामगारांना दिवसाला पाच ते सहा मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. त्यातच त्यांचा दिवस जात असून दिवसभर केवळ अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
एप्रिल महिन्यात मृत्यूने थैमान घातले असून एक एप्रिलपासून आजतागायत सुमारे 75 लोकांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूची विल्हेवाट लावण्याची संपूर्ण जबाबदारी या दहा कर्मचाऱ्यावर आहे. दापोली शहरातील ही परिस्थिती अतिशय गंभीर असून दिवसागणिक चार ते पाच लोकांचा मृत्यू होत असल्याने अंत्यसंस्कार करणाऱ्या नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे चांगलीच तारांबळ होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री आठ वाजेपर्यंत केवळ आणि केवळ मृत्यूवर अंत्यसंस्कार करणे ही एकच जबाबदारी दहा सफाई कामगार वर येऊन ठेपली आहे. कधी नव्हे ते या कामगारांना दिवसाला पाच ते सहा मृतदेहावर अंत्य संस्कार करावे लागत आहे.
त्यातच त्यांचा दिवस जात असून दिवसभर केवळ अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. एप्रिल महिन्यात मृत्यूने प्रेमान घातले असून एक एप्रिलपासून आजतागायत सुमारे 75 लोकांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूची विल्हेवाट लावण्याची संपूर्ण जबाबदारी या दहा कर्मचाऱ्यावर आहे. दापोली शहरातील स्मशानभूमीत विद्युत वाहिनी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना साध्या पद्धतीने सरण रचून अग्नी द्यावे लागत आहे. यासाठी लागणारा लाकूडसाठा 20 एप्रिल पर्यंतच पुरेसा होता. 20 एप्रिल रोजी लाकूड साठा संपल्यामुळे नगरपंचायतीने घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ लाकूड उपलब्ध करून घेतले.
हे ही वाचा-मोठा दिलासा! कोरोनाचा आलेख घसरतोय; नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्ण जास्त
अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची हेळसांड होऊ नये. याची संपूर्ण खबरदारी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, नगराध्यक्षा परवीन शेख, उप नगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर, नगरपंचायतीचे लेखापाल दीपक सावंत यांनी घेतली असून स्मशानभूमीतील लाकडी कमी होताच वन विभागाकडून लाकूड उपलब्ध करून देण्यात आले. 21 एप्रिल पासून दापोली नगरपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकूड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरण जाळण्यासाठी लागणारे पेट्रोल, अंत्यसंस्कार करण्यासाठी कर्मचाऱ्यांना लागणारे 7 ते 8 पीपीई किट दररोज उपलब्ध करून दिले जाते, हा सगळा खर्च नगरपंचायत उचलत आहे.
दापोली तालुक्यातील व्यक्तीचा शहरातील कोणत्याही कोविड सेंटरमध्ये मृत्यू झाल्यास मौजे दापोली या स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येते. या ठिकाणची सामाजिक बांधिलकी जोपासून संपूर्ण जबाबदारी दापोली नगरपंचायतीने उचलली आहे. क वर्ग दर्जा असणाऱ्या या नगरपंचायतीने आपल्या निधीतून कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्याची घेतलेली जबाबदारी माणुसकीचे दर्शन घडवणारे आहे. या नगरपंचायतीच्या सामाजिक बांधीलकीमुळे अनेक गरीब कुटुंबांना कोरोना काळात थोडासा दिलासा मिळणार आहे. कोरोनाने मृत्यू झाल्यावर त्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळतो आणि त्याच परिस्थितीमध्ये त्याला खरी गरज असते. ती म्हणजे आर्थिक मदतीची हीच गरज ओळखून दापोली नगरपंचायतीने संकट काळात टाकलेलं पाहून कोरोना काळातही अनेकांना दिलासा देणारे ठरत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.