पॅरिस, 15 ऑक्टोबर : एकीकडे काही देश कोरोनावर (Coronavirus) मात करून पुर्वपदावर आले आहेत, तर दुसरीकडे काही देशांमध्ये परिस्थिती जैसे थे आहे. अशातच फ्रान्समध्ये आता कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) दिसून येत आहे. हा धोका लक्षात घेता फ्रान्सने मोठी घोषणा केली आहे. फ्रेंच सरकारने देशात आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. फ्रान्समध्ये दुसऱ्यांदा आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आपत्कालीन आणीबाणीमुळे फ्रेंच सरकारला कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर कठोर उपाययोजना करण्याचा अधिकारही मिळू शकेल. फ्रान्सने यापूर्वी कोरोनाचा सामना करण्यासाठी मार्चमध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती. त्याअंतर्गत सरकारने कोरोना संक्रमणाविरूद्ध लोकांवर कडक निर्बंध घातले होते. यामध्ये लोकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला. ही आणीबाणी 10 जुलै रोजी संपुष्टात आणली होती. वाचा- मुंबई महापालिकेचा मोठा दणका, ‘मास्क’ न घालणाऱ्या तरुणाविरुद्ध FIR दाखल
France declares public health state of emergency over #COVID19: Reuters
— ANI (@ANI) October 14, 2020
वाचा- पुन्हा कोरोना संसर्ग गंभीर; Reinfection चे रुग्ण आढळलेल्या मुंबईची चिंता वाढली फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी बुधवारी एका टीव्ही मुलाखतीत आरोग्य आणीबाणी अंतर्गत देशातील कडक निर्बंध जाहीर केले. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, आम्हाला पावले उचलणे आवश्यक आहे. कोरोनाला रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले पाहिजेत. दरम्यान, पॅरिसमध्ये आणि कोरोना विषाणूचा संसर्ग जास्त असलेल्या ठिकाणी रात्रीच्या वेळी कर्फ्यूची घोषणा देखील केली आहे. वाचा- 24 तासांतच दुसरा धक्का! कोरोना लशीनंतर कोरोना अँटिबॉडी औषधाचंही ट्रायल थांबवलं मॅक्रॉन यांनी शनिवारपासून नऊ शहरांमधील लोकांनी रात्री 9 ते पहाटे 4 या वेळेत त्यांच्या घरी रहावे, असे आवाहन जनतेला केले. ते म्हणाले की, सावधगिरी म्हणून कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ले-डे-फ्रान्स प्रदेश तसेच लिल, ग्रेनोबल, लियोन, मार्सिले, रुएन, सेंट एटिने, माँटपेलियर, टूलूझमध्ये कर्फ्यू लागू होईल, यावर त्यांनी भर दिला. दरम्यान, बुधवारी फ्रान्समध्ये कोरोनाचे 22,951 नवीन रुग्ण आढळले. फ्रान्समध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 32 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण संक्रमितांची संख्या 7 लाख 56 हजार 472 आहे.