मुंबई महापालिकेचा मोठा दणका, ‘मास्क’ न घालणाऱ्या तरुणाविरुद्ध FIR दाखल; राज्यातली पहिलीच कारवाई

मास्क न घातल्यास आधी 200 रुपये दंड केला जात होता. आता ही रक्कम दुप्पट करण्यात आली असून आता 400 रुपये दंड भरावा लागणार आहे.

मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे या तीन गोष्टींमुळेच कोरोनाला दूर राखता येतं हे आता सिद्ध झालं आहे. त्यामुळे आपला आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी मास्कचा वापर करा असं आवाहन मुंबई महानगर पालिकेने केलं आहे.

  • Share this:
मुंबई 14 ऑक्टोबर: कोरोनाला रोखण्यासाठी मास्क वापरा असं आवाहन राज्य शासन वारंवार करत आहे. मात्र लोक नियमांचं पालन करत नसल्याने मुंबई महापालिकेने कठोर कारवाईचा करण्याचा निर्णय घेतला आहे. मास्क न वापरता कारवाईत अडथळा आणल्याबद्दल बीएमसीने एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्यातली ही पहिलीच कारवाई समजली जाते. एक दिवसापूर्वीच मुंबई महापालिकेने दंडाची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय जाहीर केला होता. प्रथमेश जाधव (वय 29) असं FIR दाखल झालेल्या व्यक्तिचं नाव असून गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मास्क न वापरणे आणि कारवाईत अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. IPC186,188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत 40 हजार जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. मुंबई महापालिका आणि मुंबई पोलीस यांनी संयुक्त मोहिम राबवून ही कारवाई केली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोनाचा धोका कायम आहे. मात्र काही लोक अजुनही मास्क वापरण्यात कुचराई करत आहेत. अशा लोकांना चाप लावण्यासाठी महापालिकेने(BMC) दंडाची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. मास्क न घातल्यास आधी 200 रुपये दंड केला जात होता. आता ही रक्कम दुप्पट करण्यात आली असून आता 400 रुपये दंड भरावा लागणार आहे. देवेंद्र फडणवीसांना आणखी एक धक्का, ‘जलयुक्त शिवार’च्या कामांची होणार SIT चौकशी महापालिका मुंबईकरांना मास्क वापरण्यासाठी आवाहन करत आहे. परंतु अनेक मुंबईकर मास्कचा वापर करत नाहीत त्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. मुंबईकरांनी सरकारच्या सर्व नियमांचं पालन करावं असं आवाहन मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केलं आहे. जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही तोपर्यंत मास्कचा वापर करणं हे अत्यावश्यक आहे असं जगभरातल्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. कंपनीला घातला 56 लाखांचा गंडा, पुणेकर उद्योजकांचा उद्योग पाहून पोलीसही हैराण मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे या तीन गोष्टींमुळेच कोरोनाला दूर राखता येतं हे आता सिद्ध झालं आहे. ‘मास्क’ आता बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून त्याच्या किंमतीही सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आहेत. त्यामुळे आपला आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी मास्कचा वापर करा असं आवाहन मुंबई महानगर पालिकेने केलं आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published: