Home /News /lifestyle /

24 तासांतच दुसरा धक्का! कोरोना लशीनंतर आता कोरोना अँटिबॉडी औषधाचंही ट्रायल थांबवलं

24 तासांतच दुसरा धक्का! कोरोना लशीनंतर आता कोरोना अँटिबॉडी औषधाचंही ट्रायल थांबवलं

हे डोस एकदाच दिले तर पुरेसे आहेत की दोन वेळा द्यावे लागतील हे अजुन स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे किमान 2024 पर्यंत कोरोनाशी लढावं लागणार असून तेवढा वेळ लसिकरणासाठी लागणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

हे डोस एकदाच दिले तर पुरेसे आहेत की दोन वेळा द्यावे लागतील हे अजुन स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे किमान 2024 पर्यंत कोरोनाशी लढावं लागणार असून तेवढा वेळ लसिकरणासाठी लागणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

कोरोनाविरोधात (coronavirus) प्रभावी लस आणि औषधांची सर्वांना प्रतीक्षा असताना आता हळूहळू निराशाच पदरी पडू लागली आहे.

    वॉशिंग्टन, 14 ऑक्टोबर : जगभरात कोरोनाव्हायरसविरोधातील लस (corona vaccine) आणि औषध (corona treatment) तयार करण्याचं काम सुरू आहे. काही महिन्यांतच लस येईल, अशी आशा सर्वांना आहे. मात्र आता हळूहळू निराशा पदरी पडू लागली आहे. अमेरिकेत आधी एका कोरोना लशीचं आणि आता कोरोना अँटिबॉडी औषधाचं ट्रायल थांबवण्यात आलं आहे. 24 तासांतच हा दुसरा मोठा धक्का आहे. अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या कोरोना लशीचं ट्रायलनंतर एली लिली कंपनीच्या कोरोना अँटिबॉडी औषधाचं (Eli Lilly) ट्रायलही थांबवण्यात आल्याची माहिती मिळते आहे. सुरक्षेची पडताळणी करणाऱ्या समितीने ट्रायल रोखण्यास सांगितलं आहे. एवी लिली कंपनी LY-CoV555 आणि  LY-CoV016 असे दोन अँटिबॉडी औषध विकसित करत आहे. एली लिली कंपनीनं अँटिबॉडी औषध तसंच औषध आहे, ज्या औषधाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उपचार करण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांना रिजनेरॉन कंपनीचं अँटिबॉडी ट्रिटमेंट देण्यात आलं होतं. हे वाचा - कोरोनावर यशस्वीपणे मात करणाऱ्यांची संख्या वाढली, वाचा गेल्या 24 तासांतील अपडेट्स LY-CoV555  औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळावी यासाठी कंपनीने एफडीएकडे अर्जही केला आहे. मात्र या दोन औषधांपैकी कोणत्या औषधाचं ट्रायल रोखण्यात आलं आहे याची माहिती कंपनीने दिली नाही. हे औषध दिलेल्या किती लोकांना समस्या उद्भवली हेदेखील कंपनीने सांगितलं नाही. मात्र रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांवर या औषधाचं ट्रायल केलं जात होतं, अशी माहिती मिळाली आहे. हे वाचा - 'बाहेर, मोकळ्या हवेत Coronavirus चा धोका कमी; पण... ' नवा अभ्यास काय सांगतो वाचा मंगळवारीच जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने आपल्या कोरोना लशीचं ट्रायल थांबवलं. एका व्यक्तीला ही लस दिल्यानंतर त्याला विचित्र आजार झाल्याचं समजलं. या आजाराचं कारण अद्याप समजलेलं नाही. मात्र सुरक्षेसाठी लशीचं ट्रायल तात्काळ थांबवण्यात आलं.  याआधीदेखील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचं ट्रायल सुरक्षेसाठी रोखण्यात आलं होतं. इतर देशांमध्ये हे ट्रायल पुन्हा सुरू झालं मात्र अमेरिकेत अजूनही सुरू करण्यात आलेलं नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या