जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पुन्हा होणारा कोरोना संसर्ग गंभीर; Reinfection चे संशयित रुग्ण आढळलेल्या मुंबईची चिंता वाढली

पुन्हा होणारा कोरोना संसर्ग गंभीर; Reinfection चे संशयित रुग्ण आढळलेल्या मुंबईची चिंता वाढली

पुण्यात सोमवारी दिवसभरात गेल्या पाच महिन्यातील निच्चांकी कोरोना रूग्णवाढ नोंदविण्यात आली. दिवसभरात अवघे 147 रूग्ण आढळून आले आहेत.

पुण्यात सोमवारी दिवसभरात गेल्या पाच महिन्यातील निच्चांकी कोरोना रूग्णवाढ नोंदविण्यात आली. दिवसभरात अवघे 147 रूग्ण आढळून आले आहेत.

भारतात कोरोना संसर्ग (coronavirus reinfection) पुन्हा उलटण्याची तीन प्रकरणं समोर आली आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 ऑक्टोबर : एकदा कोरोनाव्हायरसची लागण झाल्यानंतर पुन्हा कोरोना (Coronavirus reinfection) होतो का? एकदा संसर्ग झाल्यानंतर शरीरात तयार होणाऱ्या अँटिबॉडी किती कालावधीसाठी राहतात? कोरोनाविरोधातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती किती कालावधीसाठी राहते असे बरेच प्रश्न अनेकांना पडले आहेत. दरम्यान अशात आता भारतात कोरोनाचा संसर्ग उलटण्याची तीन संशयित प्रकरणं समोर आली आहेत. त्यातही धक्कादायक म्हणजे पुन्हा होणारा कोरोनाचा संसर्ग गंभीर असल्याचं एका संशोधनात समोर आलं आहे. भारतात कोरोना रिइन्फेक्शनची तीन प्रकरणं समोर आली आहेत. त्यापैकी दोन मुंबईत आणि एक अहमदाबादमध्ये आहे. इंडियन मेडिकल काऊन्सिल रिसर्चने (ICMR) ही माहिती दिली आहे. दरम्यान लँसेट (Lancet) जर्नलमध्ये कोरोनाव्हायरसच्या रिइन्फेक्शनबाबत एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. कोरोनाचा पुन्हा संसर्ग होऊ शकतो आणि त्याची लक्षणं अधिक गंभीर होतात असं या अहवालात म्हटलं आहे. यूएसच्या नेवाडातील 25 वर्षीय व्यक्तीला कोणताही आजार नव्हता. तिला एप्रिल 2020 मध्ये कोरोना इन्फेक्शन झालं. क्वारंटाइनमध्ये ती व्यक्ती बरी झाली. त्या व्यक्तीच्या दोन आरटी-पीसीआर टेस्ट नेगेटिव्ह आल्या. मात्र 48 दिवसांनंतर ती व्यक्ती पुन्हा पॉझिटिव्ह असल्याचं दिसून आलं. दुसऱ्यांदा कोरोना झाल्यानंतर त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करावं लागतं, ऑक्सिजन सपोर्ट लागतो, असं या अहवालात म्हटलं आहे. तसंच यामुळे कोरोनाविरोधात नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या इम्युनिटीवर नाही राहू शकत. त्यामुळे या मार्गाने हर्ड इम्युनिटी परिणामकारक नाही. हर्ड इम्युनिटीसाठी लसच आवश्यक आहे, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हे वाचा -  24 तासांतच दुसरा धक्का! कोरोना लशीनंतर कोरोना अँटिबॉडी औषधाचंही ट्रायल थांबवलं “रिइन्फेक्शन 90 की 100 किती दिवसांनी होतं, हे जागतिक आरोग्य संघटनेनंही सांगितलं नाही”, असं आयसीएमआरचे बलराम भार्गव म्हणाले. “जर काही आठवड्यातच संसर्ग पुन्हा होत असेल तर इम्युनिटी किती कालावधीसाठी राहते असा प्रश्न उपस्थित होतो. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर मिळणारी इम्युनिटी जास्त काळ राहत नाही. काही आठवडे किंवा त्यापेक्षाही कमी कालावधी राहत असावी. त्यामुळे हर्ड इम्युनिटीसाठी नैसर्गिक इम्युनिटीवर राहण्याऐवजी लसच सुरक्षित आहे”, असं संशोधक अनंत भान यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात