प्योंगयांग, 2 फेब्रुवारी: उत्तर कोरियाचे नेते (North Korea Leader) किम जोंग उन (Kim Jong Un) यांची पत्नी री सोल जू (Ri Sol Ju) यांनी तब्बल पाच महिन्यांनंतर राजवाड्यातून (residence) बाहेर पडून जनतेला दर्शन (Public Appearance) दिलं. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमाला त्यांनी पती किम जोंग उन यांच्यासोबत हजेरी लावली. सातत्यानं जनतेत मिसळणाऱ्या री गेल्या पाच महिन्यांपासून गायब असल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. प्रेक्षकांनी केला जल्लोष प्रेक्षागृहात कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी काही मिनिटं किम जोंग आणि री यांचं आगमन झालं. त्यांना पाहून उपस्थित प्रेक्षकांनी जल्लोष केला आणि दोघांच्या जयजयकाराच्या घोषणाही दिल्या. दोघांनी प्रेक्षागृहात बसून पूर्ण कार्यक्रम पाहिला आणि त्यानंतर स्टेजवर जाऊन कलाकारांसोबत फोटोदेखील काढले. पाच महिन्यांनी दर्शन किम जोंग यांची पत्नी री सोल जू या गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं किम यांच्यासोबत असतात. राजकीय कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम असो किंवा अगदी युद्धसराव असो, प्रत्येक ठिकाणी त्या किम जोंगसोबत हजर असायच्या. किम जोंग यांचे वडील किम जोंग-2 यांच्याबाबतीत मात्र हे चित्र नेमकं उलटं असे. त्यांची एकही पत्नी किंवा नातलग कधीही त्यांच्यासोबत जनतेला दिसले नव्हते. किम जोंग उन यांनी मात्र नेहमीच आपल्या पत्नीला सोबत घेऊन सार्वजनिक ठिकाणी जाणं पसंत केल्याचं चित्र होतं. मात्र गेल्या काही महिन्यांपासून री यांचं दर्शन जनतेला झालं नव्हतं. हे वाचा -
अनेक शक्यतांची चर्चा री यांची तब्येत बरी नसावी, अशी शक्यता त्यामुळे वर्तवण्यात येत होती. काहीजणांना त्या प्रेग्नंट आहेत, असं वाटत होतं. तर काहीजणांना किम जोंग यांच्यासोबत त्यांचं बिनसलं की काय, अशी शंकाही येत होती. मात्र री यांनी या सर्व शंका दूर करत कोरोनाच्या शक्यतेमुळेच आपण घराबाहेर पडलो नाही, असं म्हटलं आहे. उत्तर कोरियाने आपल्या सीमा गेल्या दोन वर्षांपासून बंद ठेवल्या असून या देशात एकही कोरोना रुग्ण आढळला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र तरीही खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या मुलांसोबतच वेळ घालवणं पसंत केल्याची प्रतिक्रिया री यांनी दिली आहे.