ऑक्सिजनची फार लागत नाही गरज; कोरोना रुग्णांवर नेमकं कसं काम करतं 2 DG औषध?

ऑक्सिजनची फार लागत नाही गरज; कोरोना रुग्णांवर नेमकं कसं काम करतं 2 DG औषध?

संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या DRDO ने डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या (Dr. Reddy’s Lab) सहकार्यानं 2-डीजी हे औषध विकसित केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 13 मे: 2-डीजी (2-deoxy-D-glucose-2DG) या औषधाला नुकतीच  ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ (DGCI) अर्थात भारतीय औषध नियामक यंत्रणेनं कोविड-19 च्या रुग्णांवरील उपचारासाठी मान्यता दिली आहे. एक पूरक उपचार म्हणून या औषधाला मंजुरी देण्यात आली असून, रुग्णावर उपचार करताना इतर उपचारांबरोबर याचा वापर केला जावा, अशी सूचना देण्यात आली आहे. हेऔषध शरीरातील विषाणू-संक्रमित पेशींना एकत्र आणून विषाणूची वाढ होण्यापासून रोखतं. क्लिनिकल ट्रायल्सनुसार (Clinical Trials) या औषधाच्या वापराने रुग्णाची ऑक्सिजनची गरज (Oxygen Supplement) तातडीनं पूर्ण होऊ शकते आणि तो लवकर बरा होऊ शकतो. असा दावा करण्यात आला आहे.

संरक्षण मंत्रालयानं डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या (Dr. Reddy’s Lab) सहकार्यानं 2-डीजी  हे औषध विकसित केलं आहे. मध्यम किंवा तीव्र लक्षणं दिसणाऱ्या कोविड-19 रुग्णांसाठी हे औषध अत्यंत उपयुक्त आहे. पावडर स्वरूपात येणारे हे औषध ग्लुकोजशी साधर्म्य असणाऱ्या जेनेरिक रेणूपासून तयार करण्यात आलं आहे.

वेगवेगळ्या देशांतील संशोधक पूर्वीपासूनच कर्करोगावरील संभाव्य उपचार म्हणून 2-डीजीचा अभ्यास करत आहेत. कारण यामुळे कर्करोगाच्या पेशींना आवश्यक असलेल्या ग्लुकोज रेणूंचा पुरवठा रोखला जातो त्यामुळे त्या नष्ट होतात. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये संरक्षण संशोधन आणि विकाससंस्था अर्थात डीआरडीओच्या (Defence Research and Development Organisation) प्रयोगांमध्ये असं आढळलं की, शरीराच्या पेशींमध्ये होणारा सार्स-कोव्ह-2 (SARSCOV-2) या विषाणूचा प्रादुर्भाव वाढवण्यासाठी डीजी-2 हे औषध उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे याचा आणखीअभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि यातूनच कोविड-19 वरील उपचारांसाठी उपयुक्त ठरणारा रेणू विकसित करण्यात यश आलं.

हे वाचा - औषधं वाया घालवली नाही, केरळ सरकारनं रेमडेसिवीरचे 1 लाख डोस केंद्राला केले परत

दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांमध्ये देशभरातील 220 रुग्णांचा समावेश असून, या औषधामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची प्रकृती झपाट्यानं सुधारत असून ऑक्सिजनवरील त्यांचं अवलंबित्व यामुळे कमी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सर्व वयोगटातील रुग्णांना हे औषध दिल्यानंतर त्यांच्यात वेगात सुधारणा झाल्याचं दिसून आलं. तसंच तीन दिवसात त्यांची ऑक्सिजनची गरज कमी झाली आणि ऑक्सिजन यंत्रणेवरून त्यांना हटवणं शक्य झाल्याचं अभ्यासात स्पष्ट झालं आहे. कोरोनावरील निश्चित उपचार पद्धतीमुळे केवळ 31 टक्के रुग्णांची तिसऱ्या दिवशी ऑक्सिजन यंत्रणेची गरज कमी होते. तर 2-डीजीचा वापर केल्यास 42 टक्के रुग्णांची 3 दिवसात ऑक्सिजन यंत्रणेची गरज कमी होते. कोरोनावरील निश्चित स्टँडर्ड उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा 2-डीजी घेणाऱ्या रुग्णांची लक्षणं दोन ते अडीच दिवसात कमी झाल्याचं आढळलं आहे.

2-डीजी ग्लुकोजप्रमाणे शरीरात पसरतं आणि विषाणू-संक्रमित पेशींमध्ये जमतं. ते विषाणूजन्य संश्लेषण आणि ऊर्जा निर्मिती थांबवून विषाणूची वाढ रोखतं. फुफ्फुसांमध्ये पसरलेल्या विषाणूच्या संसर्गदेखील ते कमी करतं. त्यामुळे रुग्णाची कृत्रिम ऑक्सिजनची गरज कमी होते आणि त्याची प्रकृती सुधारते. या औषधामुळे अनेक मौल्यवान जीव वाचवणं आणि रुग्णाचं रुग्णालयातील वास्तव्य कमी करण्यास मदत होईल, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.

हे वाचा - Black fungus वर प्रभावी ठरतोय 100 वर्षे जुना फॉर्म्युला; भारतीय डॉक्टरचा दावा

टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन केल्यास याची किंमत कमी होऊ शकते. याचे सॅशे 500 ते 600 रुपयांच्या आसपास मिळू शकतात.

First published: May 14, 2021, 3:12 PM IST

ताज्या बातम्या