हैद्राबाद, 14 मे: सध्या देशात कोरोना लशींचा पुरवठा अपूरा असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण थांबविण्यात आलं आहे. दरम्यान नागरिकांसाठी एक चांगले वृत्त समोर आले आहे. प्रतिक्षेत असलेल्या स्पुतनिक व्हीच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लशींचा संख्या वाढल्याने देशात सर्व नागरिकांना वेळेत लशींचे डोस घेता येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रशियाच्या स्पुतनिक व्हीचं (Sputnik V) लसीकरण देशात सुरू करण्यात आलं असून पहिला डोस शुक्रवारी हैद्राबाद येथे देण्यात आला. भारतात स्पुतनिकची आयात करणाऱ्या डॉ. रेड्डींज लेबोरेटरीने याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, 1 मे रोजी भारतात दाखल झालेल्या स्पुतनिक व्हीच्या लशीच्या आयातीतील पहिल्या डोसला 13 मे रोजी हिमाचल प्रदेशच्या कसौली येथील केंद्रीय औषध प्रयोगशाळेकडून नियामक मंजुरी मिळाली आहे.
किती आहे किंमत?
स्पुतनिक व्ही लशीचा पुरवठा भारतीय उत्पादक भागीदारांकडून सुरू होईल. स्थानिक पुरवठा सुरू झाल्यावर लस आयात केलेल्या डोसची किंमत सध्या 948 रुपये आहे. यावर 5 टक्के जीएसटी लागेल. येत्या काळात स्थानिक सप्लाय सुरू झाल्यानंतर या किमतीत घट होण्याची शक्यता आहे.
First doses of #SputnikV administered in India. On the picture Deepak Sapra, Global Head of Custom Pharma Services at @drreddys Laboratories is getting a shot of Sputnik V in Hyderabad. ✌️ pic.twitter.com/iBbTeB2DmT
— Sputnik V (@sputnikvaccine) May 14, 2021
हे ही वाचा-कोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल? संशोधनातून महत्त्वपूर्ण खुलासा
मिळालेल्या माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या उत्पादित दोन कोविड लशींच्या तुलनेत स्पुतनिक व्हीची लस (91.6 टक्के) अधिक कार्यक्षम आहे. पुढच्या आठवड्यापासून ही लस बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अशी माहिती गुरुवारी केंद्राने दिली. विविध राज्यांत सध्या लशींची कमतरता दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान आणखी एक लस दाखल झाल्याने पुन्हा एकदा परिस्थिती सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे लसीकरणाच्या कार्यक्रमांवर निर्बंध आले आहेत. डॉ. रेड्डीज येथून आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय रोगप्रतिबंधक प्रयत्नांचा एक भाग म्हणून स्पुतनिक व्ही लस जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते सरकारी व खाजगी क्षेत्रातील भागधारकांसह एकत्र काम करतील. कोविड-19 या साथीच्या आजाराविरुद्ध लढण्यासाठी कंपनी बांधील आहे. भारतात वाढत्या घटनांसह, कोविड - 19 विरुद्धच्या लढाईत लसीकरण हे आपले सर्वात प्रभावी साधन आहे. भारतीयांना निरोगी आणि सुरक्षित आयुष्य मिळावं यासाठी हे लसीकरण याकडे प्राधान्य देण्यात आले आहे, असे सह-अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जी व्ही प्रसाद यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Corona vaccination, Corona vaccine cost, Russia, Sanjeevani