जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / कोरोनाला हरवण्यासाठी या 2 गोष्टींचा होईल उपयोग, अमेरिकेच्या सर्वात मोठ्या हेल्थ एक्सपर्टनं सांगितले उपाय

कोरोनाला हरवण्यासाठी या 2 गोष्टींचा होईल उपयोग, अमेरिकेच्या सर्वात मोठ्या हेल्थ एक्सपर्टनं सांगितले उपाय

कोरोनाला हरवण्यासाठी या 2 गोष्टींचा होईल उपयोग, अमेरिकेच्या सर्वात मोठ्या हेल्थ एक्सपर्टनं सांगितले उपाय

.अमेरिकेचे टॉप हेल्थ एक्सपर्ट आणि राष्ट्रपती जो बायडेन (Joe Biden) यांचे चीफ हेल्थ एक्सपर्ट डॉ. अँथनी फाउची (Dr. Anthony Fauci) यांनी भारतातील कोरोना विषाणूसोबत (Coronavirus) लढा देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय सांगितले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 07 मे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान (Second Wave of Coronavirus) अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. दररोजची रुग्णसंख्या (Corona Cases in India) आणि मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. अशात जगभरातील इतर देशही भारतातील या स्थितीबाबत चिंता व्यक्त करत आहेत. यात अमेरिकेचाही (United States) समावेश आहे. अमेरिकेचे टॉप हेल्थ एक्सपर्ट आणि राष्ट्रपती जो बायडेन (Joe Biden) यांचे चीफ हेल्थ एक्सपर्ट डॉ. अँथनी फाउची (Dr. Anthony Fauci) यांनी भारतातील कोरोना विषाणूसोबत लढा देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय सांगितले आहेत. Coronavirus Second Wave : बचावासाठी कोणता Mask वापरणं योग्य? सीएनएन-न्‍यूज18 सोबत केलेल्या खास बातचीतीमध्ये फाउची यांनी सांगितलं, की भारतानं लवकरात लवकर बहुतेक लोकसंख्येचं लसीकरण करायला हवं. त्यांच्या म्हणण्यानुसार, असं केल्यास मृत्यूची संख्या कमी करण्यास मदत होईल. त्यांच्या म्हणण्यानुसार, जगभरात सध्या कोरोनाचे अनेक व्हेरियंट आहेत. अशात एक चांगली लस कोरोना विषाणूपासून तुमचा बचाव जरीही करत नसली तरी ती त्यासोबत लढण्यासाठी तुम्हाला मदत करेल. यामुळे, भारतानं अधिकाधिक लोकांचं लसीकरण करायला पाहिजे. यामुळे कोरोनाविरोधातील लढ्यात बरीच मदत मिळेल. लहान मुलांचं लसीकरण केल्यास कोरोनावर मात मिळवणे सहज शक्य डॉ. फाउची यांचं म्हणणं आहे, की कोरोनासोबतच्या लढ्यात दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजेच लोकांना रुग्णालयात जाण्यापासून वाचवणं. दुसरी ही की रुग्णालयात दाखल व्हावं लागलं तरी आवश्यक औषधं आणि साधनांच्या वापराणं कोरोनाचा संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न केला जावा. फाउची म्हणाले, की भारतातली रुग्णालयांमध्ये बेडची तात्काळ आवश्यकता आहे. यामुळे अमेरिका ऑक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजन जनरेटर पाठवून भारताची मदत करत आहे. शेवटी फाउची म्हणाले, की आपला शत्रू हा विषाणू आहे. आपण या विषाणूविरोधात एकत्र येऊन लढा देणं गरजेचं आहे. या काळात मला हेच शिकायला मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात