Covaxin लशीची मानवी चाचणी अडचणीत, व्हॉलेंटिअरच्या शरीरात दिसून आली वेगळीच लक्षणं

Covaxin लशीची मानवी चाचणी अडचणीत, व्हॉलेंटिअरच्या शरीरात दिसून आली वेगळीच लक्षणं

दिल्लीतील ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) येथे भारताच्या संभाव्य लस कोवॅक्सिनची (Covaxin) मानवी चाचणी दोन आठवड्यांपूर्वी सुरू झाली होती, मात्र आता एक समस्या समोर आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 ऑगस्ट: देशातील कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशात 18 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. तर जगभरातील इतर देशांमध्येही अशीचा परिस्थिती आहे. कोरोना लसीबाबत रोज नवनवीन अपडेट येत आहेत. सध्या जगातील विविध देशांमध्ये कोरोना लसीचे ट्रायल केले जात आहे. भारतातही लशीचे ह्युमन ट्रायल सुरू झाले आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) येथे भारताच्या संभाव्य लस कोवॅक्सिनची (Covaxin) मानवी चाचणी दोन आठवड्यांपूर्वी सुरू झाली होती, मात्र आता एक समस्या समोर आली आहे.

कोवॅक्सिनच्या या क्लिनिकल मानवी चाचणीत भाग घेणारे 20 टक्के व्हॉलेंटिअरच्या शरीरात कोरोनाविरूद्ध अॅंटिबॉडिज आधीच अस्तित्वात असल्याचे दिसून आले. असे व्हॉलेंटिअर ट्रायलसाठी योग्य नाहीत. त्यांचे प्रमाण दर पाच व्हॉलेंटिअरपैकी एक आहे.

एम्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्सने दोन आठवड्यांपूर्वी स्वदेशी लस Covaxinच्या मानवी क्लिनिकल चाचण्यांची प्रक्रिया सुरू केली. या वेळी सुमारे 80 व्हॉलेंटिअरची तपासणी करण्यात आली. पैकी केवळ 16 जण चाचणीसाठी उपयुक्त असल्याचे आढळले. संस्था 100 व्हॉलेंटिअर मध्ये सुमारे 2 आठवड्यांसाठी Covaxinच्या प्रभावाचा अभ्यास करणार होती.

वाचा-'लशीमुळेही नष्ट होणार नाही कोरोना', WHO प्रमुखांचा धक्कादायक इशारा

Covaxinच्या या मानवी चाचणीत सामील झालेल्या 18 ते 55 वयोगटातील व्हॉलेंटिअरना किडनी, लिव्हर (यकृत), फुफ्फुसे, मधुमेह यांसारख्या समस्या नसल्या पाहिजेत. या व्हॉलेंटिअरवर मानवी चाचण्या घेण्यापूर्वी याची तपासणी केली जाते.

वाचा-सलग तिसऱ्या दिवशी 24 तासांत 52 हजार नवीन रुग्ण, चिंता वाढवणारी आकडेवारी

रिजेक्शन रेट जास्त

एम्समधील Covaxinच्या मानवी चाचण्यांचा अभ्यास केलेल्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रिजेक्शन रेटचे प्रमाण बरेच जास्त आहे. 20 टक्के व्हॉलेंटिअरच्या शरीरात कोरोनाविरूद्ध अॅंटिबॉडिज आधीच अस्तित्वात असल्यामुळे त्यांच्यावर चाचणी केली जाऊ शकत नाही. याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीस आधीच कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि आता तो बरा झाला आहे. अशा परिस्थितीत या स्वयंसेवकांमध्ये लसीचा परिणाम दिसणे कठीण आहे. स्वदेशी लस Covaxinच्या मानवी चाचणीसाठी 3500 हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. 24 जुलै रोजी Covaxinचा पहिली डोस 30 वर्षीय व्यक्तीला देण्यात आला. पहिल्या आठवड्यात या व्यक्तीमध्ये साइड इफेक्ट दिसून आले नाहीत. आता डॉक्टर त्याच्याकडे अधिक लक्ष ठेवून आहेत.

वाचा-‘हर्ड इम्युनिटीने व्हायरस संपणार नाही’, कोरोनावरच्या अभ्यासाचे निष्कर्ष

'लशीमुळेही नष्ट होणार नाही कोरोना'

जागितक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख डॉ. टेड्रोस अॅडॅनॉम यांनी, अपेक्षा आहे की कोरोनाची लस (Covid-19 Vaccine) लवकरच मिळेल. मात्र सध्या कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नाही आहे आणि ते मिळेल असेही दिसत नाही आहे, असे सांगितले. WHOने सोमवारी म्हटले आहे की, COVID-19 टाळण्यासाठी लस तयार करण्याची शर्यत तीव्र झाली असली तरीही कोरोनावर कोणताही 'रामबाण उपाय' कदाचित कधीच मिळू शकणार नाही. WHOने असेही म्हटले आहे की भारतासारख्या देशात ट्रान्समिशनचे दर खूप जास्त आहेत आणि त्यांनी दीर्घ युद्धासाठी सज्ज असले पाहिजे, असे सांगितले.

Published by: Priyanka Gawde
First published: August 4, 2020, 11:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading