Home /News /coronavirus-latest-news /

'लशीमुळेही नष्ट होणार नाही कोरोना', WHO प्रमुखांचा धक्कादायक इशारा

'लशीमुळेही नष्ट होणार नाही कोरोना', WHO प्रमुखांचा धक्कादायक इशारा

WHOने सोमवारी म्हटले आहे की, COVID-19 टाळण्यासाठी लस तयार करण्याची शर्यत तीव्र झाली असली तरीही कोरोनावर कोणताही 'रामबाण उपाय' कदाचित कधीच मिळू शकणार नाही.

    पॅरिस, 04 ऑगस्ट : कोरोनानं जगभरात थैमान घातले आहे. अद्याप कोरोनाची लस उपलब्ध नसली तरी, काही लशीच्या चाचणी या अंतिम टप्प्यात आहेत. मात्र यातच जागितक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख डॉ. टेड्रोस अॅडॅनॉम यांनी, अपेक्षा आहे की कोरोनाची लस (Covid-19 Vaccine) लवकरच मिळेल. मात्र सध्या कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नाही आहे आणि ते मिळेल असेही दिसत नाही आहे, असे सांगितले. WHOने सोमवारी म्हटले आहे की, COVID-19 टाळण्यासाठी लस तयार करण्याची शर्यत तीव्र झाली असली तरीही कोरोनावर कोणताही 'रामबाण उपाय' कदाचित कधीच मिळू शकणार नाही. WHOने असेही म्हटले आहे की भारतासारख्या देशात ट्रान्समिशनचे दर खूप जास्त आहेत आणि त्यांनी दीर्घ युद्धासाठी सज्ज असले पाहिजे. वाचा-‘हर्ड इम्युनिटीने व्हायरस संपणार नाही’, कोरोनावरच्या अभ्यासाचे निष्कर्ष WHOचे संचालक टेड्रोस यांनी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले की कोरोनावर कोणताही ठोस उपचार नाही आहे. बहुधा कधीच होणार नाही. त्यांनी असेही म्हटले आहे की परिस्थिती सामान्य होण्यास अधिक वेळ लागू शकेल. टेड्रोस यापूर्वी बर्‍याच वेळा म्हणाले आहे की कोरोना कधीही संपू शकत नाही आणि त्याबरोबर जगायला शिका. टेड्रोस म्हणाले की कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जगभरातील लोक सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे आणि मास्क घालत आहेत आणि हे सुरू ठेवणे आवश्यक आहे. आतापर्यंत जगभरात एक कोटी 81 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. वाचा-Covid ची लस आल्यानंतरही नाही बदलणार जग; कोरोनासोबतच जगावं लागणार 'लस मिऴाल्यानंतरही कोरोना संपेल, असे नाही' टेड्रोस म्हणाले की, 'बर्‍याच लस ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. आशा आहे की एक लस लोकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी प्रभावी ठरेल.मात्र, यासाठी कोणतेही निश्चित औषध नाही आणि असेही शक्य आहे की ते कधीही सापडणार नाही. अशा परिस्थितीत, आपण टेस्ट, आयसोलेशन आणि मास्कद्वारे कोरोना थांबविण्याचे कार्य चालू ठेवूया. त्यांनी असेही म्हटले आहे की ज्या मातांना कोरोनाची लक्षण आहेत किंवा कोरोनाचा संसर्ग झाला आहे त्यांनी स्तनपान करणे थांबवू नये. टेड्रोस यांनी याआधी जूनच्या सुरुवातीलाही म्हटले होते की, "आम्हाला माहित आहे की वृद्ध वय असलेल्यांपेक्षा मुलांमध्ये कोरोनाचा धोका कमी असतो, परंतु असे बरेच रोग आहेत जे मुलांना जास्त धोका देऊ शकतात आणि स्तनपानामुळे असे आजार रोखले जाऊ शकतात". दुसरीकडे लवकरात लवकरत लस मिळेल अशी आशाही टेड्रोस यांनी यावेळी व्यक्त केली.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या