Home /News /coronavirus-latest-news /

सलग तिसऱ्या दिवशी 24 तासांत 52 हजार नवीन रुग्ण, चिंता वाढवणारी आकडेवारी

सलग तिसऱ्या दिवशी 24 तासांत 52 हजार नवीन रुग्ण, चिंता वाढवणारी आकडेवारी

गेल्या 24 तासांत 52 हजार 050 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 803 जणांचा मृत्यू झाला.

    नवी दिल्ली, 04 ऑगस्ट: देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सलग तिसऱ्या दिवशी 50 हजारहून अधिक कोरोना रुग्ण सापडले. गेल्या 24 तासांत 52 हजार 050 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 803 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18 लाख 55 हजार 746 झाली आहे. यात 5 लाख 86 हजार 298 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 12 लाख 30 हजारहून अधिक रुग्ण निरोगी झाले आहे. इंडियन काउन्सिल ऑफ रिसर्च (ICMR) नुसार देशात आतापर्यंत 2 कोटी 8 लाख 64 हजार 750 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सोमवारी एकाच दिवसात तब्बल 6 लाख 61 हजार 182 लोकांची चाचणी करण्यात आली. कोरोना संक्रमितांच्या संख्येत भारत, अमेरिका आणि ब्राझील जगातील तीन सर्व प्रभावित देश आहे. मात्र यात भारतातील परिस्थिती चांगली आहे. भारताचा मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. भारतापेक्षा अधिक प्रकरणं अमेरिका (4,862,174), ब्राझीलमध्ये (2,751,665) आहेत. राज्यातील परिस्थिती राज्यात 3 ऑगस्ट 2020 पर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 04 लाख 50 हजार 196 एवढी झाली आहे. राज्यात Active रुग्णांची संख्या 1,47,018 एवढी झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत 15,842 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आज 46 जणांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत 6493 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 3 ऑगस्टला राज्यात 266 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आजपर्यंत रुग्णांची एकूण संख्या 1,17,406 एवढी झाली आहे. मुंबई 20,528 एवढे रुग्ण Active आहेत अशी माहिती महापालिकेने दिली आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या