भारतात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ही संख्या वाढत असल्याने हर्ड इम्युनिटी वाढली आहे असंही म्हटलं जात आहे. दिल्लीतल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी यावर केलेल्या अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष पुढे आले आहेत. कोरोनावर अजुन औषध निघालेलं नाही, त्यामुळे हर्ड इम्युनिटीमुळे फायदा होईल असं म्हटलं जात होतं. मात्र ‘हर्ड इम्युनिटी’ हा काही पर्याय होऊ शकत नाही असं मत Institute of Liver and Biliary Sciences चे संचालक डॉ. एस.के. सरीन यांनी म्हटलं आहे. कोरोना सारख्या महाभयंकर साथीसबोत लढण्यासाठी ‘हर्ड इम्युनिटी’ हा उपाय नाही असं मतही सरीन यांनी व्यक्त केलं. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. सरीन आणि त्यांच्या पथकाने दिल्लीत अभ्यास करून हे निष्कर्ष काढले आहेत. प्रत्येक 5 कोरोना रुग्णांपैकी 1 रुग्णांमध्ये योग्य प्रमाणात Antibodies तयार झाल्याचं आढळून आलं नाही असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे.