Home /News /coronavirus-latest-news /

आनंदाची बातमी! लवकरच भारतात लाँच होणार Covovax लस, प्रभावाबाबत कंपनीचा मोठा दावा

आनंदाची बातमी! लवकरच भारतात लाँच होणार Covovax लस, प्रभावाबाबत कंपनीचा मोठा दावा

नोव्हाव्हॅक्सची कोव्हाव्हॅक्स (Covovax) ही लस सप्टेंबरपर्यंत भारतात लाँच होऊ शकते. सध्या देशात सीरमची कोविशिल्ड, भारत बायाटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाच्या स्पूतनिक व्ही या लसींचा वापर होत आहे.

    नवी दिल्ली 16 जून : कोरोना विषाणूविरोधात (Coronavirus) लढा देण्यासाठी भारताला लवकरच आणखी एक लस मिळू शकते. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) सीईओ आदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी अशी आशा व्यक्त केली आहे, की नोव्हाव्हॅक्सची कोव्हाव्हॅक्स (Covovax) ही लस सप्टेंबरपर्यंत भारतात लाँच होऊ शकते. सध्या देशात सीरमची कोविशिल्ड, भारत बायाटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाच्या स्पूतनिक व्ही या लसींचा वापर होत आहे. आदर पूनावाला म्हणाले, की कोव्हाव्हॅक्सचे ट्रायल पूर्ण होत आले आहेत. CNBC TV18 ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं, की रेग्यलेटरीकडून परवानगी मिळाल्यास कोव्हाव्हॅक्स सप्टेंबरपर्यंत भारतात लाँच होण्याची तयारी होऊ शकते. त्यांनी सांगितलं, की भारतात नोव्हाव्हॅक्सच्या या लसीचे ट्रायल नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकतात. सप्टेंबर 2020 मध्ये, नोव्हाव्हॅक्सने त्यांची लस NVX-CoV2373 साठी सीरम संस्थेबरोबर उत्पादन कराराची घोषणा केली होती. सीरमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी माहिती दिली, की देशात ट्रायलचा टप्पा पूर्ण होण्यापूर्वीच कंपनी जागतिक आकडेवारीवर आधारित परवान्यासाठी अर्ज करू शकते. 7 महिन्याच्या चिमुरडीचा जीव वाचवण्यासाठी हवे होते 16 कोटी, जमा झाले केवळ 40 लाख कंपनीने 14 जून रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं होतं, की कोविड संसर्गाच्या मध्यम आणि गंभीर प्रकरणांमध्ये NVX-CoV2373 लसीमुळे 100% संरक्षण दिसून आले आहे. या लसीचा एकूण कार्यक्षमता दर 90.4 टक्के असल्याची माहिती त्यांनी दिली होती. या अभ्यासात अमेरिका आणि मेक्सिकोमधील 119 वेगवेगळ्या ठिकाणांतील 29 हजार 960 लोक सहभागी असल्याचे निवेदनात म्हटलं आहे. नुकतेच नीति आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी नोव्हाव्हॅक्सची लस सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार केली जाईल अशी माहिती दिली होती. नरभक्षकानं आईला मारुन मृतदेहाचे हजार तुकडे करत खाल्ले, मिळाली 15 वर्षाची शिक्षा फार्मा कंपनी जुलैपर्यंत लहान मुलांवप कोव्होव्हॅक्सच्या ट्रायलचा विचार करीत आहे. देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊन 150 दिवस झाले आहेत. 16 जूनपर्यंत सकाळी 7 पर्यंतच्या सरकारी आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे, की देशात आतापर्यंत 26 कोटी 19 लाख 72 हजार 14 डोस देण्यात आले आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या