Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबरोबर आणखी एक संकट! सर्वाधिक चर्चा झालेलं हे औषध न वापरण्याचा WHO चा सल्ला

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबरोबर आणखी एक संकट! सर्वाधिक चर्चा झालेलं हे औषध न वापरण्याचा WHO चा सल्ला

COVID-19 Update: अँटी-व्हायरल ड्रग रेमडीसीव्हरचा (Remdesivir) कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापर न करण्याचा जागतिक आरोग्य संघटनेने सल्ला दिला आहे.

    पॅरिस, 20 नोव्हेंबर: अँटी-व्हायरल ड्रग रेमडेसिवीरचा (Remdesivir) कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापर न करण्याचा जागतिक आरोग्य संघटनेने सल्ला दिला आहे. रुग्णांची परिस्तिथी कितीही खराब असली तरीही या औषधाचा वापर न करण्याचे डब्लूएचओने म्हटले आहे. रुग्णांच्या आरोग्यावर याचा कोणताही सकारात्मक परिणाम होत नसल्याने या औषधाचा वापर थांबवण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) दिला आहे. सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरलेल्या काही उपचारांचे परिणाम डब्ल्युएचओच्या  Guideline Development Group (GDG) या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या समितीने अभ्यासले. सध्याच्या डेटावरून असा कोणताच पुरावा आढळून आला नाही की, ज्यामुळे कोरोना रुग्णाची स्थिती सुधारते आहे, असं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी हे उपचार करू नयेत असा सल्ला दिला आहे. या तज्ञांच्या मते  रेमडेसिवीरच्या सकारात्मक परिणामाचा कोणताही डेटा मिळाला नसून रुग्णाच्या आरोग्यामध्ये सुधारणा होत असल्याचा कोणताही डेटा उपलब्ध नाही. (हे वाचा-पुण्यातील 85% लोकांमध्ये सापडल्या अँटीबॉडिज, देशातील पहिलाच प्रकार) सुरुवातीच्या संशोधनातून कोरोना व्हायरसच्या रूग्णांमध्ये बरा होण्याचा कालावधी कमी होत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर अमेरिका, युरोपियन युनियन आणि इतर देशांनी रेमडेसिवीरच्या वापरास तात्पुरती मंजुरी दिली होती. त्यावेळचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर देखील उपचार करताना इतर औषधांबरोबर या औषधाचा देखील वापर करण्यात आला होता. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ऑकटोबरमध्ये डोनाल्ड ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केलेले हे परिणाम जवळपास 7 हजार रुग्णांवर केलेल्या चाचणीच्या आधारे आहेत. बीएमजे मेडिकल जरनलमध्ये अद्ययावत उपचार मार्गदर्शन प्रकाशित करताना, या पॅनेलने कबूल केले की, त्यांच्या शिफारसीचा अर्थ असा नाही की रेमडेसिवीरचा रुग्णांना कोणताही फायदा नाही. परंतु नुकत्याच उपलब्ध झालेल्या आकडेवारीच्या आधारे त्यांनी आपली मते मांडली आहेत. 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत रेमडेसीवीरच्या विक्रीत जवळपास 900 दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली असल्याची माहिती उत्पादक गिलियड (Gilead) कंपनीने मागील महिन्यात सांगितले होते. (हे वाचा-पुणेकरांनो काळजी घ्या! 22 दिवसांत असं बदललं चित्र, महापौरांनी केलं आवाहन) सुरुवातीला इबोला या आजारासाठी रेमडीसीवर औषधाचा वापर केला जात असे. यानंतर मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या उपचारांमध्ये हे औषध प्रभावी ठरत असल्याचे समोर आले होते. यामध्ये कोरोना रुग्णांचा हॉस्पिटलमधील कालावधी 15 दिवसांवरून 11 दिवसांवर येत असल्याचे सिद्ध झाले होते. 30 देशांमधील 11,000 हून अधिक रूग्णांचा रुग्णालयातील काळ कमी होण्यास किंवा त्यांचा प्राण वाचवण्यासा रेमडेसिवीर औषधाचा फारसा किंवा काहीच उपयोग झाला नसल्याचे डब्ल्यूएचओच्या प्रि-प्रिंटमध्ये म्हटलं आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या