पुणेकरांनी कोरोनाला हरवलं? पुण्यातील 85% लोकांमध्ये सापडल्या अँटीबॉडिज, देशातील पहिलाच प्रकार

पुणेकरांनी कोरोनाला हरवलं? पुण्यातील 85% लोकांमध्ये सापडल्या अँटीबॉडिज, देशातील पहिलाच प्रकार

रुग्णांची संख्या वाढूनही 'या' प्रभागात विकसित झाली कोरोनावर मात करणारी प्रतिकारशक्ती.

  • Share this:

पुणे, 20 नोव्हेंबर : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना पुण्यात मात्र पुन्हा संक्रमित रुग्णांची संख्या वाढली आहे. एकीकडे पुण्यात दुसरी लाट येण्याचे संकेत असताना काही प्रभागात हर्ड इम्युनिटीची (herd immunity) विकसित झाल्याचे संकेत मिळाले आहे. याबाबत ठोस माहिती नसली तरी, तज्ज्ञांनी पुण्यातील काही प्रभागांमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित होत असल्याची शक्यता वर्तवली आहे.

हर्ड इम्युनिटी लोकसंख्येच्या अशा लोकांमध्ये अप्रत्यक्ष प्रतिकारशक्ती विकसित करते ज्यांना कधीच संसर्ग झाला नाही. दरम्यान, देशात पहिल्यांदाच एखाद्या शहरात हर्ड इम्युनिटीची लक्षणं आढळून आल्यानं एक दिलासादायक बाब समोर आली आहे.

पुण्यातील कोरोनाची लागण झालेल्या 85 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडिज सापडल्याचा भारतातील पहिलाच प्रकार आहे. हे संशोधन पुण्यातील चार विभागात (ज्यात मनपाचे तीन ते चार प्रभाग आहेत) केले गेले, जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या सर्वेक्षणात 51 टक्के लोकसंख्येमध्ये संसर्ग आढळला. यापैकी लोहिया नगर या प्रभागात आता हर्ड इम्युनिटीची लक्षणे आढळून आली आहेत.

वाचा-पुणेकरांनो काळजी घ्या! 22 दिवसांत असं बदललं चित्र, महापौरांनी केलं आवाहन

लोकसंख्येच्या संसर्गाचा प्रसार सीरो सर्व्हेद्वारे केला जातो. हे सर्वेक्षण भारतातील अनेक शहरांमध्ये केले गेले आहे. हे पहिले सर्वेक्षण आहे ज्यामध्ये संक्रमित लोकांमध्ये व्हायरसशी लढा देणारी अँटीबॉडिज सापडल्या आहेत. हर्ड इम्यूनिटी लोकांमध्ये प्रतिकारशक्ती विकसित करण्याचे काम करते.

वाचा-तुमच्यापर्यंत कधी पोहोचणार Corona Vaccine? लशीचा गुण कितपत? लशीबद्दल सर्व काही..

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

एकीकडे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे पुण्यानं मात्र चिंता वाढवली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्या वाढत आहे. 19 नोव्हेंबर रोजी पुण्यात 411 नवीन रुग्ण सापडले. तर, 7 जणांचा मृत्यू झाला. 385 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे तर, 250 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. गेल्या आठवड्यात कमी झालेली रुग्णांची संख्या आता पुन्हा वाढली आहे. त्यामुळे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लोकांना काळजी घेण्याचे आव्हान केले आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: November 20, 2020, 12:00 PM IST

ताज्या बातम्या