Home /News /coronavirus-latest-news /

सलग दुसऱ्या दिवशी देशात रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद, पाहा 24 तासांतील लेटेस्ट अपडेट

सलग दुसऱ्या दिवशी देशात रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद, पाहा 24 तासांतील लेटेस्ट अपडेट

देशात एकूण 33 लाख 87 हजार 501 कोरोना रुग्ण आहेत. तर, 7.45 लाख रुग्ण अॅक्टिव्ह असून 25.8 लाख रुग्ण निरोगी झाले आहेत.

    नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : देशात दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 77 हजार 266 नवीन रुग्ण आढळून आले. तर, 1,057 रुग्णांचा मृत्यू झाला. आता देशात एकूण 33 लाख 87 हजार 501 कोरोना रुग्ण आहेत. तर, 7.45 लाख रुग्ण अॅक्टिव्ह असून 25.8 लाख रुग्ण निरोगी झाले आहेत. गेल्या 24 तासांत 60 हजार रुग्ण निरोगी होऊन घरी परतले आहेत. गुरुवारी देशात 75 हजार रुग्ण आढळून आल्यानंतर आज पुन्हा एकदा कोरोनानं रेकॉर्ड मोडला आहे. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील हा आकडा सर्वात जास्त आहे. याआधी अमेरिकेत 25 जुलै रोजी 78 हजार 427 आणि 17 जुलै रोजी 76 हजार 730 रुग्ण एका दिवसात सापडले होते. त्यानंतर आता भारतातील रुग्णांचा आकडा आहे. वाचा-पुणेकरांसाठी चिंतेची बाब! 60+ वय असेल तर सावधान, धक्कादायक रिपोर्ट आला समोर मृतांचा आकडा 61 हजार पार देशातील मृतांचा आकडाही वाढत आहे. सध्या एकूण मृतांची संख्या 61 हजार पार झाली आहे. आतापर्यंत 61 हजार 694 लोकांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी 1,065 लोकांचा मृत्यू झाला. यातील महाराष्ट्रात सर्वात जास्त 355 लोकांच्या मृत्यूसह एकूण आकडा 23 हजार 444 झाला आहे. तर, तामिळनाडूमध्ये 109, कर्नाटकात 141 आणि आंध्र प्रदेशात 92 रुग्णांचा मृत्यू झाला. वाचा-कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या मात्र लक्षणं नसलेल्यांनी वाढवली चिंता वाचा-142 दिवसांनंतर पुन्हा कोरोनाची लागण; धक्कादायक कारणं आली समोर, संशोधकही हैराण 3 कोरोना वॅक्सिनवर काम सुरू कोरोना वॅक्सिनची वाट संपूर्ण जग पाहत आहे. एकीकडे रशिया आणि चीन यांनी कोरोना लस तयार केल्याचा दावा केला असला तरी, ही लस किती सुरक्षित आहे, याबाबत संभ्रम आहे. आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 3 कोरोना वॅक्सिन अंतिम टप्प्यात असल्याचे आज सांगितले. लवकरच या कोरोना लशीचे परिणाम दिसल्यानंतर त्याच्या उत्पादनाला सुरुवात होणार आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या